◾रुग्णवाहिकेवर स्वतः चे छायाचित्र छापून आमदारांची चमकुगिरी; शासनाने खरेदी केलेल्या रुग्णवाहिकेवरून पक्षांचा प्रचार
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
पालघर: जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी खरेदी केलेल्या रुग्णवाहिका रुग्णवाहिका खरेदी केल्या असून गरीब जनतेला त्याचा उपयोग होणार आहे. पालघर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेल्या रुग्णवाहिका स्वागतार्ह असल्या तरी या रुग्णवाहिकांवर छापण्यात आलेले फोटो आक्षेपार्ह आहेत. नागरीकांच्या पैशातून खरेदी केलेल्या रुग्णवाहिकेवर राजकीय मंडळींचे फोटो छापले असून येथील आमदारांने स्वतः चा प्रचार करण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न समोर आला आहे.
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्णवाहिके अभावी अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. यासाठी जिल्ह्यात रुग्णवाहिकेची मागणी नागरीकांन कडून केली जात होती. याबाबत विक्रमगड विधानसभा क्षेत्रांचे आमदार सुनील भुसारा यांनी आपल्या आमदार निधीतून रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी पत्र शासनाला दिले होते. त्यानुसार काही दिवसापूर्वी 12 रुग्णवाहिकेचे लोकार्पण पालघर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने या रुग्णवाहिका खरेदी केल्या असून शासनाने खरेदी केलेल्या रुग्णवाहिकांवर आमदारांचे व महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो कसे हा प्रश्न उपस्थित होत आहे. यातच झाडून उपस्थित असलेले अधिकारी व त्यातल्यात्यात पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसल यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा पार पडला असला तरी जिल्हाधिकारी यांनी अशा शासकीय वाहनावर छापण्यात आलेले फोटो याबाबत मौन बाळगल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
आमदार सुनील भुसारा यांनी जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी केलेला प्रयत्न अतिशय स्वागतार्ह आहे. ग्रामीण भागात रुग्णवाहिका अभावी होत असलेल्या गरीब आदिवासी लोकांच्या मृत्यू मुळे याभागात आमदारांनी आपला सर्वाधिक निधी आरोग्य वेवस्थेवर खर्च करणे आवश्यक आहे. शासनाने खरेदी केलेल्या रुग्णवाहिका विक्रमगड मतदारसंघातील सूर्यमाला, खोडाळा, आसे, जव्हार तालुक्यातील साखरशेत व पावर, वाडा तालुक्यात गोर्हे व खनिवली, विक्रमगड तालुक्यातील दोन प्राथमिक आरोग्य केन्द्र तर तीन रुग्णवाहिका जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडे देण्यात आल्या आहेत. विक्रमगड आमदारांना आपल्या करत असलेल्या कोणत्याही लहान मोठ्या कामाची प्रसिद्धी करणे अधिकच आवडत असून आता महाविकास आघाडीचा धाक दाखवून कोणकोणत्या योजनेवर आपले छायाचित्र छापतात ये येणाऱ्या काळात पाहत राहावे लागणार आहे.
◾ आमदार असून देखील मंत्री असलेल्या थाटामाटात वावरत असलेल्या आमदारांनी याअगोदर देखील बेकायदेशीर पणे खाजगी वाहनांवर सायरनचा भोंगा लावून मतदारसंघात वावरत होते. यातच दोन अधिक सुरक्षा रक्षक बंदुकधारी घेवुन फिरत असल्याचा प्रकार समोर आला होता.