■ ऑक्सिजन गळतीने मृत पावलेल्या २२ रुग्णांच्या वारसांना प्रत्येकी ५लाख देण्याचे मुख्यमंत्र्यांनी केले जाहीर.
पालघर दर्पण, प्रतिनिधी
नाशिकमधून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याने २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजन टाकीच्या वॉलमधून लिकेज झाल्यामुळे प्रेशर कमी झाले व २२ व्हेंटीलेटेड रुग्ण मृत्यूमुखी पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या घटनेवर मुख्यमंत्री यांनी व्यक्तव्य केले असुन या संपूर्ण घटने बाबत खोलात चौकशी केली जावी असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्याच बरोबर अपघातात मृत पावलेल्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे मुख्यमंत्री यांनी जाहीर केले आहे. त्याच बरोबर गेल्या वर्षभरापासून कोविडच्या या महामारीशी सामना करत आहोत. डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. अशा बिकट परिस्थितीत निष्काळजीपणाने जीव जाणे मनाला अतिशय बोचणारे आहे. पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी प्रशासनाने अतिशय काळजीपूर्वक आणि डोळ्यात तेल घालून काम केले पाहिजे. असे देखील मुख्यमंत्री म्हणाले.
नाशिकमध्ये झालेल्या ऑक्सिजन गळती या घटनेवर राज्यपालांनी व अजित पवारांनी देखील शोकसंदेश लिहला आहे. नाशिकमध्ये झालेली घटना दुदैवी आहे. असे सांगत बाधित व्यक्ती लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना करतो असे सांगितले. तर अजित पवार यांनी २२ जणांचा मृत्यु झाल्याची घटना क्लेशदायक असुन सहसंवेदना व्यक्त केल्या.