◾ धोकादायक टाकलेल्या गतिरोधकामुळे वाहनचालकांना त्रास; अणुऊर्जा प्रकल्पाकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यावर अडथळे
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाकडे जाणारा अति महत्त्वाचा असलेल्या बोईसर तारापूर रस्त्यावर बेकायदेशीर पणे धोकादायक असे गतिरोधक टाकण्यात आले आहेत. स्थानिक नेत्यांनी ठेकेदाराला हाताशी घेवून टाकण्यात आलेल्या धोकादायक गतिरोधकाला नागरीकांन कडून देखील विरोध केला जात आहे. यातच गतिरोधकाला परवानगी नसताना सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष का केले असा सवाल उपस्थित केला जात आहे.
बोईसर तारापूर मुख्य रस्ता मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वळदळ दिवसभर असते. यातच या रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले असून रस्त्यावर पास्थळ भागात गतिरोधक टाकण्याचा घाट काही राजकीय मंडळींनी घातला होता. मुख्य रस्त्यावर गतिरोधक टाकण्याची परवानगी नसताना देखील ठेकेदाराने बेकायदेशीर पणे गतिरोधक याठिकाणी चार ते पाच ठिकाणी टाकले. अतिशय उंच असलेल्या गतिरोधकामुळे वाहने आदळत असून अपघाताची स्थिती निर्माण झाली आहे. मुळात गतिरोधक हा सहा इंच उंच व दोन्ही बाजूला एक एक मिटर रूंद असतो. मात्र याठिकाणी उंच टाकलेले गतिरोधक वाहन चालकांना त्रासदायक ठरू लागले आहेत. मुळात गतिरोधकाला परवानगी नसताना देखील कोणाच्या परवानगी नुसार हे काम करण्यात आले याबाबत सवाल उपस्थित केला जात आहे. याठिकाणी टाकण्यात आलेल्या बेकायदेशीर गतिरोधक काढून टाकण्याची मागणी जोरधरू लागली आहे.
◾ तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाकडे जाण्यासाठी हा एकमेव महत्त्वाचा रस्ता असून देखील या रस्त्यावर अडथळ टाकत गतिरोधक बनविण्यात आले. नियमानुसार हा संपूर्ण रस्ता गतिरोधका विना असणे बंधनकारक असुन आपत्कालीन स्थितीत हे गतिरोधक अधिकच धोकादायक ठरू शकतात.