◾ बोईसर मधील सिटी स्कँन सेंटर मध्ये रुग्णांची लुट
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: करोना रुग्णांना छातीचे सिटी स्कँन करण्याचे प्रमाण वाढल्याने सिटी स्कँन चालकांनी रुग्णांची लुट सुरू केली होती. नियमापेक्षा अधिक रक्कम याठिकाणी आकारली जात होती. याबाबत माहिती मिळताच पालघर दर्पणने संपादक व बोईसर मधील सामाजिक कार्यकर्ते यांनी सिटी स्कँन सेंटरवर जाऊन याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून देत नियमाप्रमाणे शुल्क घेणे बंधनकारक केले.
बोईसर शहरात असलेल्या सिटी स्कँन सेंटर मध्ये रूग्णांन कडून 3500 रूपये एचआरसीटीचे घेतले जात होते. जिल्हा आरोग्य विभागाचे अधिकारी देखील जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आले. आज याबाबत समाज माध्यमातून आवाज उचलल्यावर पालघर दर्पणचे संपादक हेमेंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत संखे, ग्रामपंचायत सदस्य अतुल देसाई व सामाजिक कार्यकर्ते सचिन संखे यांनी तातडीने बोईसर मधील सिटी स्कँन सेंटर मध्ये जावून परिस्थिती जाणून घेतली.
बोईसर मधील रुप रजत सिटी स्कँन सेंटर, आँरेंज सिटी स्कँन सेंटर व बोईसर सिटी स्कँन सेंटर याठिकाणी बेकायदेशीर पणे खाजगी रुग्णांन कडून 3500 रूपये घेत असल्याने दिसून आल्यावर त्याचा जाब संबंधित सिटी स्कँन चालकांना विचारण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी केळकर यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी शासन दरपत्रक बाबत कळवतो सर्वांना असे सांगितले. शासनाच्या परिपत्रका नुसार 2 हजार रूपये घेणे बंधनकारक असताना याठिकाणी राजरोसपणे लुट चालली होती. सर्वांना समज दिल्यानंतर व अधिकाऱ्यांची कान उघडणी केल्यानंतर सर्व ठिकाणी यापुढे शासनाच्या पत्रकानुसार 2 हजार रूपये आकारले जातील असे सिटी स्कँन चालकांनी मान्य केले आहे.
◾ गेल्या महिन्याभरात शेकडो नागरीकांनी बोईसर मधील या तिनही सिटी स्कँन सेंटर वर जाऊन अधिक रक्कम देवून आपली तपासणी केली होती. रुग्णांना अतिरिक्त भुर्दंड पडला असून बेकायदेशीर पणे अधिक रक्कम घेणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र आरोग्य विभागाशी साटेलोटे असलेल्या लुटारू सिटी स्कँन सेंटर मालकांना मोकाट सोडलेले आहे.