■मोठ्यासंख्येने लसीकरण करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य; राजेश टोपे
पालघर दर्पण, प्रतिनिधी
सध्या राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान माजवले आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत असुन रुग्णांच्या मृत्युचा आकडा वाढत आहे. अशातच राज्यात सुरू असलेल्या मोहिमे मार्फत लसीकरण जलद रित्या होत असल्याची सकारात्मक माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संगीतिली आहे. व आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्राने आज दीड कोटी लसीकरण पूर्ण केले असून एवढ्या मोठ्यासंख्येने लसीकरण करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरलेलं आहे. काल दिवसभरात ५ लाख ३४ हजार नागरिकांना लस देऊन राज्याने विक्रमी नोंद केली आहे. असे राजेश टोपे यांनी आज ट्विट केले आहे.
दररोज ८ लाख लसीकरणाचे राज्यने उद्दिष्ट ठेवले असून लसींचा पुरवठा वेळेवर व्हावा अशी मागणी केंद्र शासनाकडे केली आहे. राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना १२ कोटी डोसची आवश्यकता आहे. त्याच बरोबर राज्यत ऑक्सिजनच्या वापरा बाबत प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून त्यानुसार रुग्णांना ऑक्सिजन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे असे देखील टोपे यांनी सांगितले.