कर्मचारी आणि डॉक्टरांच्या सावधतेने सुदैवाने नाशिक दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली
पालघर दर्पण: सचिन भोईर
विक्रमगड: तालुक्यातील रिव्हेरा कोविड हॉस्पिटलमध्ये जम्बो ऑक्सिजन टँकच्या वॉल्व्हमधून सुरू झाली होती. मात्र वेळीच ही गळती थांबविल्याने मोठा अनर्थ टळला. येथील कर्मचाऱ्यांनी आणि डॉक्टरांनी प्रसंग सावधता दाखवत पाईपलाईन मध्ये सुरु झालेली गळती तात्काळ दुरुस्त केली आणि घडणारी मोठी दुर्घटना टळली आहे.
पालघर जिल्ह्यातील महत्वाचे असलेले विक्रमगड तालुक्यातील हातणे येथील रिव्हेरा कोविड हॉस्पिटल मधील जम्बो ऑक्सीजन टँकच्या वॉल्व्हमधून गळती ऑक्सिजची गळतीला सुरू झाली होती. सोमवारी संध्याकाळी ६ वाजता झालेल्या या प्रकारामुळे हॉस्पिटल मध्ये धावपळ सुरू झाली होती. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रिव्हेरा कोविड हॉस्पिटल मध्ये सद्य स्थितीत ३०२ रुग्ण उपचार घेत असुन यापैकी १५० रुग्णांना ऑक्सिजनवर पुरवठा केला जात आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या रुग्णालयात करोनावर उपचार घेत असलेल्या २२ रूग्णांचा ऑक्सिजन गळतीमुळे मृत्यू झाला होता. त्याची पुनवृत्ती मात्र टाळण्यात येथील कर्मचाऱ्यांना यश आले असले तरी हा प्रकार रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मनात भीती भारविणारा असाच होता.