■सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के; तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.५४ टक्के आहे.
पालघर दर्पण, प्रतिनिधी
दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण बळावत असुन करोना बधितांनाच्या मृत्यू संख्येतही वाढ होत आहे. मात्र अशातच दिलासादायक बाब समोर आली आहे. जितक्या संख्येत करोना रुग्णांची वाढ होत आहे त्यापेक्षा जास्त संख्येत करोना रुग्ण बरे होऊन घरी परतत आहेत.
राज्यात आज ६२ हजार १९४ करोना रुग्ण सापडले आहेत. मात्र अशातच दिलासादायक बाब समोर आली आहे. ६३ हजार ८४२ करोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आता पर्यंत राज्यात ४२,२७,९४० करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आज ८५३ करोना बाधित रुग्णांनी मृत्यू झाला असुन सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के एवढा आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.५४ टक्के एवढा झाला आहे.
काल ५ मे रोजी महाराष्ट्रात १५८६ लसीकरण केंद्रांद्वारे एकूण २ लाख ५८ हजार ६८५ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये १८ ते ४४ वयोगटातील १ लाख ५३ हजार ९६७ नागरिकांचा समावेश आहे. राज्यामध्ये आतापर्यंत १ कोटी ३९ लाख १५ हजार ८८ नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला तर २८ लाख ६६ हजार ६३१ नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. या नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून सर्वाधिक नागरिकांना दोन्ही डोस देणाऱ्या राज्यांमध्येही महाराष्ट्र पहिला आहे. तसेच त्याच बरोबर लस वाया जाण्याचे महाराष्ट्रचे प्रमाण केवळ १ टक्के आहे.