◾ बोईसर चिल्हार रस्त्यावर दुभाजक फक्त शोभेसाठी; प्रत्येक ठिकाणी ठेवलेल्या मोकळ्या जागांन मुळे अपघातांना निमंत्रण
◾महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सुसज्ज रस्त्यांचे वाजवले बारा
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रात येणाऱ्या बोईसर चिल्हार रस्त्यांचे चौपदरीकरण सुरू असून या मुख्य रस्त्यावर ठिक ठिकाणी दुभाजकांन मध्ये मोकळे ठेवलेले रस्ते धोकादायक ठरू लागले आहेत. चुकिच्या पध्दतीने प्रत्येक ठिकाणी ठेवलेल्या मोकळ्या जागेमुळे अचानक येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही. यामुळे अपघाताचे प्रमाण याठिकाणी वाढले आहे. यातच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने बड्या लोकांची मर्जी राखण्यासाठी काही भागात आवश्यकता नसताना देखील दुभाजक मोकळे सोडले आहेत.
बोईसर चिल्हार रस्त्यावर ज्याठिकाणी गाव पाडे व वसाहतीचे मुख्य रस्ते याठिकाणी दुभाजक वाहने व नागरिकांना जाण्यासाठी मोकळे असणे बंधनकारक आहेत. मात्र या मुख्य रस्त्यावर ठिकाणी प्रत्येक 50 ते 100 मिटर अंतरावर बेकायदेशीर पणे उद्योजक, अनधिकृत बांधकामे व अनधिकृत धाब्यांन साठी दुभाजक मध्ये मोकळीक सोडली आहे. यातच काही ठिकाणी तर फक्त 4 ते 5 मिटर नंतर देखील दुभाजक सोडलेले दिसून येतात. बोईसर बेटेगाव पासून वाघोबा खिंड पर्यंत अवघ्या आठ किलोमीटर रस्त्यावर 22 पेक्षा अधिक ठिकाणी दुभाजक मोकळे सोडलेले दिसतात. यातच मान येथील विराज प्रोफाइल कारखान्यासाठी वळण रस्त्यावर मोकळा सोडलेला दुभाजका मुळे मोठ्या प्रमाणात अपघात याठिकाणी नेहमी होतात.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आपली मर्जी राखण्यासाठी अनेक ठिकाणी चुकिच्या पध्दतीने दुभाजक मोकळे सोडल्याचा आरोप नागरिकांन कडून केला जात आहे. सुर्यानदी पुलाजवळ देखील महेंद्र सिंदू वाडी जवळ दुभाजक मोकळा सोडला असून फुलाचा पाडा पर्यंत अवघ्या 100 मिटर अंतरावर तिन ठिकाणी हा दुभाजक मोकळा आहे. यामुळे अचानक रस्ता ओलांडून वाहने दुसऱ्या बाजूला ये-जा करत असल्याने अपघाताची स्थिती निर्माण होत आहे. अतिशय सुंदर बनविण्यात आलेल्या रस्त्यावर अशा प्रकारे चुकिच्या कामामुळे हा रस्ता धोकादायक ठरू लागला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अनागोंदी कारभारामुुळे सुसज्ज रस्त्यांचे बारा वाजले आहेत.