◾ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या साठवून ठेवलेल्या एसडीपी पाईपला आग; रसायन भरलेल्या टँकरने पेट घेतल्याने घडली घटना
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रात मोकळ्या जागेवर साठवून ठेवलेल्या एसडीपी पाईपला भिषण आग लागली आहे. गुरुवारी दुपारच्या वेळी लागलेल्या आगीचे लोंढे पालघर पर्यंत दिसून येत आहेत. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.
औद्योगिक क्षेत्रात एन झोन मधील प्लाँट नं.171 या रासायनिक कारखान्यांच्या समोर असलेल्या टँकर क्रमांक एम एच 48 वाय 3407 हा ज्वलनशील रसायन असलेला टँकर उभा होता. गुरूवारी दुपारी 1:30 च्या सुुुमारास टँकर मधील ज्वलनशील रसायनाला आग लागल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. काही क्षणातच याठिकाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने साठवून ठेवलेल्या एसडीपी पाईपला भिषण आग लागली. या आगीत रसायन भरलेला ट्रक पुर्ण जळून गेला असून पाईपाला लागलेल्या आगीवर नियंत्रण आणण्याचे काम युध्द पातळीवर सुरू असून याठिकाणी अग्निशमन दलाचे चार बंब आहेत. प्राथमिक माहिती अशी की, टँकरला आग ही बाजूला धुर निघत असलेल्या लहानश्या आगीमुळे लागली असल्याचे याठिकाणी उपस्थित असलेल्या कामगारांनी सांगितले.