◾शेकडो घरांचे नुकसान,काही ठिकाणी तुंबले होते पाणी
पालघर दर्पण: वार्ताहर
मनोर: तोक्ते चक्रीवादळाचा पालघर तालुक्याच्या किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा बसला आहे. वादळी वारे आणि अतिवृष्टीमुळे बोईसर पश्चिमेच्या मुरबे गावातील सुमारे शंभर घरांच्या छताचे पत्रे उडाल्याने नुकसान झाले असून अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत.
मुरबे बंदरात जेट्टीला जोडणारा रस्ता मत्स्यव्यवसाय विभागाकडून तयार करण्यात आला होता. या रस्त्याच्या बांधकामामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने मुरबे गावातील काही ठिकाणी अनेक पाणी तुंबले होते. त्यामुळे मच्छीमार आणि ग्रामस्थांची गैरसोय झाली होती.