पालघरच्या ग्रामिण भागात पेट्रोलच्या दरवाढीने सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला
पालघर दर्पण: नविद शेख
मनोर: कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारने निर्बंध लागू केल्याने अनेक उद्योग धंदे बंद आहेत. त्यामुळे बेरोजगारीत वाढ झालेली असताना इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांना घाम फुटला आहे. पेट्रोलच्या किंमती शंभरी पार झाल्याने महागाई वाढणार असून सर्वसामान्यांच्या खिशाचा भार वाढला आहे. पेट्रोल दरवाढीचा रिक्षाचालक आणि सर्वसामान्य नागरिकांनी केंद्र सरकार विरोधात संताप व्यक्त केला आहे.
पालघर मध्ये शनिवारी 29 मे रोजी पेट्रोलच्या दरांनी शंभरी पार केली आहे. पेट्रोलच्या शंभरी पार झालेल्या दरांनी सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम केलेला आहे. पालघर तालुक्याच्या पूर्वेकडील ग्रामीण भागात पेट्रोलच्या दरांनी शंभरी पार करून रेकॉर्ड रचला आहे. कोरोना प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे उद्योग धंदे बंद पडले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात बेरोजगारी वाढली असून पेट्रोलचे दरांनी शंभरी पार केल्याने रिक्षा चालक आणि सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीस आले आहेत. इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल दरवाढीचा फटका ग्रामीण भागात सर्वसामान्यांना बसल्याने केंद्र सरकारचा निषेध केला जात आहे.
◆स्वयंपाकाचा गॅस आणि खाद्यतेल आधीच महाग झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडून पडले असतात पेट्रोलचे दर शंभरी पार झाले आहेत. करोनाच्या संकटामुळे त्रस्त असलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना महागाईमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागण्याची चिन्हे दिसत आहेत.
◾पेट्रोलची किंमतीने शंभरी पार केल्याने आमच्या खिशाला चाट पडणार आहे. कोरोनाच्या निर्बंधांमुळे रस्त्यावर प्रवाशी नाहीत, त्यामुळे भाड्यात वाढ करता येत नाही. परिणामी रिक्षा व्यवसाय नुकसानीचा ठरत आहे.
— प्रमोद ताठे,रिक्षाचालक,मनोर
इंडियन ऑइल हिंदुस्तान पेट्रोलियम
27/05. 99.89 99.87
28/05. 99.89 99.87
29/05. 100.14 100.12
30/05 100.14 100.12