■ काय असणार सुरू काय असणार बंद
पालघर दर्पण, प्रतिनिधी
शनिवारी मध्यरात्री नंतर राज्यात अनलॉकचे नवे आदेश जाहीर झाले आहेत. या आदेशानुसार सोमवार पासून ५ टप्प्यात अनलॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. करोना रुग्णांची संख्या व ऑक्सीजन बेडची संख्येच्या आधारावर अनलॉक करण्यात आले आहे.
पहिला स्तरात ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर ५ टक्क्यांपेक्षा कमी असेल तसेच ऑक्सिजन बेड २५ टक्क्यापेक्षा कमी भरलेले असतील. दुसरा स्तर हा ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असेल आणि भरलेले ऑक्सिजन बेडची टक्केवारी २५ ते ४० च्या दरम्यान असेल. तिसरा स्तर हा पॉझिटिव्हिटी दर पाच ते दहा टक्के दरम्यान असेल आणि व्यापलेले ऑक्सिजन बेड ४० टक्क्यांपेक्षा जास्त असेल. चौथा स्तर हा ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर १० ते २० टक्के दरम्यान असेल आणि ६० टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड रुग्णांनी भरलेले असेल. तसेच पाचवा स्तर हा जेथे २० टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी जर असेल आणि ८५ टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्यापले असेल.
■ *कोणत्या स्तरासाठी कोणत्या सेवा सुरू कोणत्या बंद*
*पहिला स्तर* – अत्यावश्यक सेवे बरोबरच इतर दुकानेही सुरू राहतील. हॉटेल, सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, पार्क, सर्व खाजगी कार्यालये, सार्वजनिक वाहतूक, जिम, सलून, स्पा, मॉल तसेच चित्रपट गृह देखील देलखी सुरू करण्यात येतील. तसेच लग्न समारंभ, संस्कृतीक व मनोरंजन संबंधित नेहमी प्रमाणे सुरू करता येतील.
*दुसरा स्तर* – अत्यावश्यक सेवे बरोबर इतर दुकाने देखील सुरू राहतील. जिम, सलून, स्पा मॉल, संस्कृतीक मनोरंजनाशी संबसनधित कार्यक्रम व चित्रपट गृह ५०% क्षमतेने सुरू राहतील. लग्न समारंभ ५०% क्षमतेने १०० जणांना जमण्याची परवानगी. सर्व खाजगी कार्यालये, पार्क व मैदाने सुरू करण्यात येतील. व इंडोअर गेम्ससाठी सकाळी ५ ते ९ व संध्याकाळी ६ ते ९ परवानगी आहे. सार्वजनिक वाहतूकिस परवानगी.
*तिसरा स्तर* – अत्यावश्यक सुविधा व खाजगी कार्यालये रोज दुपारी ४ वाजे पर्यत सुरू असतील. तसेच इतर दुकाने आठवड्यातील ५ दिवस चार वाजे पर्यत सुरू असतील. हॉटेल देखील आठवड्यातील ५ दिवस दुपारी ४ वाजे पर्यत सुरू राहतील व त्यात नंतर केवळ पार्सल व होम डिलिव्हरी करण्याची परवानगी. मॉल व चित्रपट गृह बंद राहितल. मैदानी खेळांना सकाळी ६ ते ९ व संध्याकाळी ६ ते ९ परवानगी. संस्कृतीक व मनोरंजनाशी संबंधित कार्यक्रम आठवड्यातील ५ दिवस दुपारी चार वाजे पर्यत ५०% क्षमतेने सुरू राहतील. लग्न समारंभात ५० जणांनाच उपस्थितीची परवानगी. जिम, सलुन व स्पा ५०% क्षमतेने सुरू अपॉइंटमेंट घेऊन येणाऱ्या परवानगी व एसी वापरास बंदी. सार्वजनिक वाहतून सुरू राहील.
*चौथा स्तर* – अत्यावश्यक सेवा दुपारी ४ वाजे पर्यत सुरू राहतील. इतर दुकाने बंद राहतील. मॉल, संस्कृतीक तसेच मनोरंजना संबंधित कार्यक्रम व चित्रपट गृह बंद राहतील. हॉटेलमध्ये केवळ पार्सल सुविधा व डिलिव्हरी सुविधा असेल. सार्वजनिक ठिकाणे, मैदाने व पार्क पहाटे ५ ते सकाळी ९ पर्यत पाच दिवस सुरू राहतील. निर्बंधांमधून वगळण्यात आलेल्या क्षेत्रातील खासगी कार्यालयांना परवानगी. गर्दीच्या ठिकाणी सिन शूट करण्यास मनाई. लग्न समारंभात २५ जणांना उपस्थितीची परवानगी. जिम, सलुन व स्पा ५०% क्षमतेने सुरू अपॉइंटमेंट घेऊन येणाऱ्या व लसीकरण झालेल्या ग्राहकांना परवानगी व एसी वापरास बंदी. सार्वजनिक वाहतूक सेवा ५०% क्षमतेने सुरू राहील.
*पाचवा स्तर* – अत्यावश्यक सेवा आठवड्यातील ५ दिवस दुपारी ४ वाजे पर्यत सुरू राहतील. शनिवार रविवार बंद. इतर दुकाने बंद. हॉटेलमध्ये फक्त पार्सल सुविधा व होम डिलेव्हरी साठी परवानगी. निर्बंधांमधून वगळण्यात आलेल्या क्षेत्रातील खासगी कार्यालयांना परवानगी. मॉल, चित्रपट गृह, सार्वजनिक ठिकाणे, पार्क, मैदाने, जिम, सलून, स्पा, सांस्कृतिक व मनोरंजनाशी संबंधित कार्यक्रम बंद. लग्न समारंभास केळव कुटुंबाच्या उपस्थीतीस परवानगी. सार्वजनिक वाहतूक सेवा ५०% क्षमतेने सुरू.