■ यंदा मुंबई तुंबणार नाही असा आदित्य ठाकरेंचा दावा फोल; महापालिकेचा ५ वर्षात १ हजार कोटींचा घोटाळा आशिष शेलारांच ट्विट.
पालघर दर्पण, प्रतिनिधी
मुंबई : मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये मान्सूनच्या पहिल्या पावसाने हजेरी लावली आहे. मात्र यात मुंबईची अवस्था दरवर्षी प्रमाणे यंदाही तशीच आहे. मान्सूनच्या पहिल्या पावसातच मुंबई तुंबली आहे. यावर्षी मुंबई तुंबणार नाही असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र पहिल्या पावसातच मुंबई तुंबली असल्याने विरोधीपक्ष आदित्य ठाकरे यांच्या दाव्यावर व शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेच्या नालेसफाईवर प्रश्न उपस्थित करीत आहे.
मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. यावर्षी मुंबई तुंबणार नाही असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता. मात्र हा दावा खरा ठरला नसल्याने विरोधी पक्षाकडून ट्विटरच्या माध्यमातून टिका केली जात आहे. पहिल्या पावसातच मुंबई तुंबली असल्याने भाजपचे आमदार ऍड आशिष शेलाल यांनी ट्विटर वर टीका केली आहे. डेब्रीजच्या गोण्या जशाच्या तशा नाल्यात पावसाचे पाणी मुंबईकरांच्या घरात आणि मलाईच्या गोण्या मात्र कंत्राटदारांच्या खिशात असे शेलार यांनी सांगितले आहे.
मुंबईत दरवर्षीप्रमाणे पाणी तुंबले आहे. घरात पाणी घुसू लागले आहे. नालेसफाई कधी १०७ टक्क्ये आहे तर कधी १०४ टक्क्येचा दावाचा फोल ठरला. प्रशासनाने काम केलं नाही कंत्राकदराने पळ काढला. सत्ताधाराने कंत्राकदाराच्या केलेल्या कुकृत्यावर पांघरून घातलं. संपूर्ण मुंबईमध्ये दर वर्षाला ७० ते १०० कोटी रुपये केवळ नालेसफाईसाठी. ५ वर्षात ५०० कोटी रुपये ते सोडून छोटे नाले व स्टॉर्म वॉटर दुरुस्ती असो व पाणी तुंबू नये म्हणून दरवर्षी १०० कोटी प्रमाणे ५ वर्षाचे अधिकचे ५०० कोटी म्हणजे ५ वर्षात १ हजार कोटींचा खर्च पण मुंबईकारांच्या नशिबी केवळ तुंबलेलं पाणी घरात घुसण्याची स्थितीत आहे. जिथे पाणी तुंबत नव्हतं तिथेही पाणी तुंबलेलं आहे. असे देखील शेलार यांनी सांगितले.