◾ चिकन लाँलीपाँप मध्ये आढळले कोंबडीची पिसे; दामदुप्पट किंमतीने विक्री केलेल्या खाद्यपदार्थ आरोग्यासाठी घातक?
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: दामदुप्पट रक्कम लावून विक्री करणारे खाद्यपदार्थ दर्जाहीन असल्याचे बोईसर मध्ये उघडकीस आले आहे. येथील एका हाँटेल मध्ये खाद्यपदार्थात कोंबडीची पिसे आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे खाद्यपदार्थाच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर आला असून अशा हाँटेलवर कारवाई करण्याची गरज आहे. दर्जाहीन खाद्यपदार्थ विक्री केले जात असल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
बोईसर येथील “द सेट्रीन फाईन डाईन या नावाने भव्य हाँटेल असून याठिकाणी दर्जाहीन पदार्थांची विक्री केली जात असल्याची बाब समोर आली आहे. याठिकाणाहुन रविवारी दुपारी चिकन लाँलीपाँप आणण्यात आले होते. मात्र बंद पिशवी खोलल्या नंतर लाँलीपाँप मध्ये कोंबडीची पिसे असल्याचे समोर आले. एक नवे तर पिशवीत असलेल्या जवळपास सर्वच लाँलीपाँप मध्ये ही पिसे आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हाँटेल मध्ये चमकूगिरी मोठ्या प्रमाणात दाखवली जात असून येथील खाद्यपदार्थ मात्र नागरीकांच्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे या प्रकारामुळे समोर आले आहे. दामदुप्पट पद्धतीने अन्नपदार्थांची रक्कम याठिकाणी घेतली जात असून खाद्यपदार्थ दर्जाहीन असल्याने या हाँटेलवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
◾बोईसर भागात मोठ्या प्रमाणात हाँटेल व चायनीज काँर्नर असून अनेक ठिकाणी उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री केली जाते. स्वच्छता बाबत कोणत्याही प्रकारची खबरदारी याठिकाणी घेतली जात नाही. नागरिकांना तक्रारी करण्यासाठी याठिकाणी कोणत्याही प्रकारचा अन्न प्रशासनाचा अधिकारी नसल्याने अशा दर्जाहीन खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या हाँटेल चालकांचे फावत आहे.