■ १० ते १५ किमी पर्यतच्या परिसरात फटाक्यांच्या आवाजाने हादरे बसले; देहणे येथे घरांचे नुकसान
पालघर दर्पण, प्रतिनिधी
पालघर: डहाणू तालुक्यात डेहणे पळे येथील एका फटाके कारखान्याला आग लागली असल्याची घटना गुरुवारी सकाळी १०च्या दरम्यान घडली आहे. या आगीत फटाके कारखाना संपूर्ण जळून गेला असून कारखान्यात काम करत असणारे १० कामगार जखमी आहेत. १० कामगारांपैकी ५ कामगार गंभीर जखमी आहेत. कारखान्यात लागलेली आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ४ गाड्या पाचारण करण्यात आल्या.
डहाणू तालुक्यात डेहणे पळे येथे विशाल फटका कारखान्याला वेल्डिंगच्या कामामुळे आग लागली. दिवाळी निमित्त काही दिवसांपूर्वीच कंटेनर भरून फटाके साठा आणण्यात आला होता. तसेच किरकोळ फटाके बनवण्याचे काम सुरू असताना सोमवारी वेल्डिंगचे काम करत असताना त्याची ठिणगी फटाके साठ्यावर उडाली फटाक्यांना आग लागताच काही क्षणातच आगीने भीषण रुप धारण केले. या कारखान्यात ४५ कामगार काम करीत होते. आगीची चाहूल लागताच कारखाना मालकासह कामगार बाहेर पळाले. मात्र आगीमध्ये ५ जण कामगार गंभीर जखमी असुन जखमींना डहाणू उपजिल्हा रुग्णालयात व सेवा नर्सिंग होम या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
फटाके पेटल्याने आसपासच्या ५ ते १० किलोमीटर पर्यत राहणाऱ्या नागरिकांना फटाके फुटण्याचे आवाज आले. सुरुवातीला नागरिकांमध्ये हे भूकंपाचे धक्के आहेत असा समज झाला. मात्र आगीने भीषण रूप धारण केल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. फटाके फुटण्याच्या मोठं मोठ्या आवाजामुळे आगवण, देदाळे, डेहणे, पळे, आशागड, डहाणू शहर, वाणगाव, साखरे व कासा चारोटी परिसरात हादरे बसले. यादरम्यान डेहणे येथे अनेक घरांचे नुकसान झाले आहे.
■ डहाणू कारखाना आग दुर्घटना ५ गंभीर जखमी. त्यातील ४ डहाणू येथील दवाखान्यात आणि १ वापी गुजरात ला पाठवण्यात आले आहेत.
१) नवनीत लोटे (वय ३२)
२) महेश मोरे (वय ४०)
३) असिफ खान (वय ३२)
४) प्रेमचंद चव्हाण (वय २५)
५) सुखदेव सिंग (वय ५०)