◾नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्यू आव्हानाला ग्रामीण भागातील जनतेने ही दिली साथ
पालघर दर्पण: विषेश प्रतिनिधी
करोना सारख्या महामारीचा सामना करण्यासाठी पंतप्रधानांचे देशाला नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च रोजी संपूर्ण देशात लावलेल्या जनता कर्फ्यू ला नागरीकांनी साथ दिली आहे. पालघर जिल्ह्यातील अनेक भागात मुख्य रस्त्यावर एकही वाहन किंवा नागरीक दिसत नाहीत. यातच बोईसर परिसरात दिवसभर भरगच्च असलेले रस्ते रविवारी पुर्णपणे मोकळे व शांततेचे पाहावयास मिळाले.
बोईसर परिसरात रोज लाखो नागरीकांन प्रवास करत असतात, यातील रेल्वे स्थानक, ओत्सवाल, चित्रालय, एमआयडीसी नाका याठिकाणी मोठ्या प्रमाणात पहाटे पासुनच नागरीकांची वरदळ असते. मात्र आज जनता कर्फ्यू मुळे सर्वच नागरीकांनी पंतप्रधानांच्या आव्हानाला साथ देत घरीच थांबण पसंत केले आहे.
तसेच रोज सकाळी माँर्निग वाँक साठी रस्त्यावर दिसणारे नागरीक यांनी देखील आज सुट्टी घेतली आहे. यामुळे दिवसभर भरगच्च असलेला बोईसरचा परिसरात सुकसुकाट पाहावयास मिळाला.