■ जिल्ह्यात पॉजिटीव्हीटी दर ५.१८ टक्के व ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी दर १८.२४ टक्के; २१ जूनपासून निर्बंध वाढवणार
पालघर दर्पण: प्रतिनिधी
पालघर : ५ जूनला अनलॉकचे नवीन आदेश जारी झाल्या नंतर पालघर जिल्ह्याचा समावेश लेव्हल ३ मध्ये होता. त्यांनतर जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा खाली व ऑक्सीजन बेड्सची ऑक्युपन्सी २७.६६ टक्के असल्याने १४ जूनपासून लेव्हल २ मध्ये समावेश करण्यात आला. मात्र आता पुन्हा पालघर जिल्ह्याचा समावेश लेव्हल ३ मध्ये झाला आहे.
या आठवड्यात संपूर्ण पालघर जिल्ह्याचा कोविड-१९ चा पॉजिटीव्हिटी दर ५.१८ टक्के व ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी दर १८.२४ टक्के जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्याचा लेव्हल ३ मध्ये समावेश करण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने निर्णय घेतला असून २१ जून पासून पालघर जिल्ह्यात निर्बंध वाढवणार आहे.
■ पालघर जिल्हा तिसऱ्या स्तरात
अत्यावश्यक सुविधा व खाजगी कार्यालये रोज दुपारी ४ वाजे पर्यत सुरू असतील. तसेच इतर दुकाने आठवड्यातील ५ दिवस चार वाजे पर्यत सुरू असतील. हॉटेल देखील आठवड्यातील ५ दिवस(शनिवार व रविवार बंद) दुपारी ४ वाजे पर्यत सुरू राहतील. त्यात नंतर केवळ पार्सल व होम डिलिव्हरी करण्याची परवानगी. मॉल व चित्रपट गृह बंद राहितल. मैदानी खेळांना सकाळी ६ ते ९ व संध्याकाळी ६ ते ९ परवानगी. संस्कृतीक व मनोरंजनाशी संबंधित कार्यक्रम आठवड्यातील ५ दिवस दुपारी चार वाजे पर्यत ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. लग्न समारंभात ५० जणांनाच उपस्थितीची परवानगी. अंत्यविधी साठी २० जणांना उपस्थितीची परवानगी. जिम, सलुन व स्पा ५० टक्के क्षमतेने सुरू अपॉइंटमेंट घेऊन येणाऱ्या परवानगी व एसी वापरास बंदी सार्वजनिक वाहतून सुरू राहील. अंतर जिल्हा प्रवास हा नियमितपणे सुरू राहील परंतु निर्बंध स्तर ५ मधील जिल्ह्यामध्ये जाण्याकरिता ई- पास आवश्यक आहे