◾ बोईसर चिल्हार रस्त्यावर उभारण्यात आलेल्या बेनू दा ढाबा च्या अनधिकृत बांधकामावर प्रशासन मेहरबान; राजकीय दबावामुळे महसूल विभागाचे दुर्लक्ष
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: आदिवासी जागेवर अनधिकृत बांधकाम करून उभारल्या भव्य ढाब्याकडे महसूल विभागाने दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. स्थानिक आदिवासी नागरीकांनी बोईसर चिल्हार रस्त्यावर वेळगाव येथे आदिवासी जागेवर उभारलेल्या ढाब्याबाबत तक्रार करून देखील पालघर तहसीलदार यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. राजकीय दबावामुळे महसूल विभाग स्थानिक आदिवासी लोकांनी केलेल्या तक्रारी कडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरीकांन कडून केला जात आहे.
बोईसर चिल्हार रस्त्यावर वेळगाव येथे कोंढाण ग्रामपंचायतीच्या हद्दीत मुख्य रस्त्यालगत सर्वे नंबर 15/2 या आदिवासी मिळकतीच्या जागेवर अनधिकृत ढाब्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. बेनू दा ढाबा अशा नावाने सुरू करण्यात आलेल्या अनधिकृत ढाब्यावर कारवाई करण्याची मागणी नागरीकांन कडून केली जात आहे. याबाबत 11 जानेवारी 2021 रोजी ग्रामस्थांनी तहसीलदार पालघर यांना पत्र देवुन आदिवासी जागेवर केलेल्या बांधकामावर कारवाई करण्याबाबत कळविले होते. मात्र पाच महिने उलटून देखील तहसीलदार यांच्या कडून कोणत्याही प्रकारची कारवाई आजवर झालेली नाही. यातच या अनधिकृत ढाब्याला कोंढाण ग्रामपंचायतीने देखील तिन वेळा नोटीस बजावली आहे. परंतु राजकीय दबावामुळे प्रशासन स्थानिक आदिवासी लोकांनी केलेल्या तक्रारी कडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. यातच एखाद्या गरिब नागरीकांने स्वतः च्या जागेवर राहते घर बांधकाम केले असताना कारवाई साठी तत्परता दाखवणारे महसूल विभागाचे तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदार अशा बड्या लोकांच्या बांधकामाकडे सोईस्कर पणे दुर्लक्ष का करते असा सवाल नागरिकांन कडून उपस्थित केला जात आहे.
◾बोईसर चिल्हार रस्त्यावर मोठ्या प्रमाणात आदिवासी जागेवर अनधिकृत बांधकामे उभी राहिलेली आहेत. महसूल विभाग कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई याठिकाणी करताना दिसत नाही. यातच बेनू दा ढाबा हा आदिवासी जागेवर उभारण्यात आलेला असून धाब्यांचे बांधकाम करण्यासाठी ढाबा मालकांने येथील जागा मालक आदिवासी खातेदाराला पुढे केले होते. कोंढाण ग्रामपंचायतीने या जागा मालकाला तिन वेळा नोटीस बजावली होती. मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई आजवर झालेली नाही.