◾ 50 एमएलडी सामुहिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील रासायनिक घातक रसायन थेट नैसर्गिक नाल्यात
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या 50 एमएलडी सामुहिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील रासायनिक सांडपाणी थेट नैसर्गिक नाल्यात जात असल्याचे दिसून आले आहे. तारापूर ईनवोरमेन्ट प्रोटेक्शन सोसायटीस मार्फत हा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प चालवला जात असून पर्यावरण सुधारण्याचा कांगावा करणारेच प्रदूषण करत असल्याचा आरोप नागरिकांन कडून केला जात आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यातुन सांडपाण्यावर प्राथमिक प्रक्रिया केल्यानंतर हे रासायनिक सांडपाणी सामुहिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात आणले जाते. रासायनिक सांडपाण्यावर संपूर्ण प्रक्रिया करून हे सांडपाणी समुद्रात सोडले जाते. मात्र अपुर्ण असलेला 50 एमएलडी प्रकल्पात सद्यस्थितीत हे रासायनिक सांडपाणी आणले जात असून त्यावर रासायनिक प्रक्रिया होण्यापूर्वीच हे रासायनिक घातक सांडपाणी नैसर्गिक नाल्यात जात आहे. येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील रासायनिक घातक सांडपाणी टाकीच्या बाहेर वाहत जात असून याकडे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प चालवणाऱ्या तारापूर ईनवोरमेन्ट प्रोटेक्शन सोसायटीस ने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. हे रासायनिक सांडपाणी नैसर्गिक नाल्यातून खाडी भागात जात असल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण याठिकाणी होत आहे.
◾ 50 एमएलडी सामुहिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून बेकायदेशीर पणे सोडले जात असलेले रासायनिक सांडपाणी नैसर्गिक नाल्यातून कोलवडे येथील मोरी खाडीतून नवापूर खाडी मार्गे समुद्रात जाते. यामुळे आजूबाजूला असलेल्या शेतीचे मोठे नुकसान झाले असून याठिकाणी कुठल्याही जमीन सुपीक राहिलेली नाही.
◾ रासायनिक सांडपाणी मुळे खाडीत मिळणारे खेकडे, बोयमासे, नावेरे, कोलंबी अशा अनेक प्रकारचे लहान मोठे मासे मिळणे बंद झाले आहे.
◾ रासायनिक सांडपाणी थेट नाल्यात सोडले जात असल्याने भूगर्भातील पाण्याचा साठा पुर्णपणे दूषित झाला असून औद्योगिक क्षेत्र लगत असल्या गावामध्ये कुपनलिकेला रसायन युक्त रंगीत पाणी येते.