■ सार्वजनिक मूर्ती ४ फुटांच्या तर घरगुती मूर्ती २ फुटॅनच्या; गणेश चतुर्थीसाठी राज्य सरकाने केली मार्गदर्शक सूचना जाहीर.
पालघर दर्पण, प्रतिनिधी
संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. मात्र यंदा देखील करोनाचे विघ्न कायम असल्याने सरकारने गणेश चतुर्थी सणा संदर्भात नियमावली जाहीर केली आहे. राज्य सरकारने नियमावलीत जाहीर केलेल्या उंची प्रमाणेच गणेशमूर्त्यांची उंची असणे आवश्यक आहे.
गेल्या वर्षी कोविड-१९ मुळे गणेश चतुर्थी जल्लोषात व नेहमी प्रमाणे थाटात साजरी करता आली नाही. त्यामुळे यंदाच्या वर्षी तरी गणेश चतुर्थी मोठ्या जल्लोषात व थाटात साजरी करता येईल अशी गणेश भक्तांना आशा होती मात्र गेल्या वर्षी प्रमाणेच यंदाही कोविड-१९ महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे गणेशोत्सव जल्लोषात व मोठ्या प्रमाणावर गर्दी करून साजरा करत येणार नाही. राज्य सरकारने गणेश मूर्ती किती फुटाच्या या असतील या संबंधित नियमावली जाहीर केली आहे. यंदा सार्वजनिक गणेश मूर्ती ४ फूट तर घरगुती गणेश मूर्ती२ फुटांच्या अशी मर्यादा आहे. त्याच बरोबर गणेश चतुर्थी दरम्यान पाळले जाण्यासाठी राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
■ गणेश चतुर्थी दरम्यान मार्गदर्शक सूचना.
गणेश चतुर्थी साजरी करण्यासाठी परवानगी घेणे अपेक्षित.
कोविड-१९ महामारीच्या दुसऱ्या लाट बळावत असल्याने गणेश चतुर्थी साधेपणानेच करावी.
सार्वजनिक गणेश मूर्ती ४ फूट व घरगुती गणेश मूर्ती २ फुट असावी
विसर्जन कृत्रिम तलावात करावे व शाडूच्या मातीची मूर्ती ठेवावी.
शक्य तितकी मंडप परिसरात होणारी गर्दी टाळावी.
गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी.
सांस्कृतिक उपक्रमा ऐवजी आरोग्य कार्यक्रम राबवावेत.
गर्दी टाळण्यासाठी बाप्पाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल, नेटवर्किंग, वेबसाईट, फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी.
आरती, भजन, कीर्तन या दरम्यान होणारी गर्दी टाळावी.