■ ६ आठवड्यांच्या आत नुकसान भरपाई भरपाईची रक्कम ठरवण्यात यावी; सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला आदेश.
पालघर दर्पण, प्रतिनिधी
करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असुन मृत्यू संख्येत ही मोठी वाढ झालेली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबियांना नुकसान भरपाई द्यावी लागेल असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला आदेश दिला आहे.
गेल्या २४ तासात ४५,६४१ नवीन रुग्ण आढळले असुन ६०,२५८ रुग्ण बरे झाले आहेत. तर ८१६ जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नागरिक हैराण आहेत. करोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना ४ लाख आर्थिक मदत करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यालायत दाखल करण्यात आली होती. यावर केंद्राने नुकसान भरपाई होऊ शकत नाही असे सांगितले होते. यावेळी केंद्राने आपली बाजू मांडत एसडीआरएफ फंडातील सर्वच निधी करोना करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबियांना नुकसान भरपाई म्हणून देण्यात आला तर करोनासंदर्भातील उपाययोजना, विविध आवश्यक औषधी व पुरवठा साहित्यसाठी तसेच चक्रीवादळ आणि परिस्थितीबद्दल मदत करण्यासाठी राज्याकडे पैसे उरणार नाही असे सांगितले.
मात्र आज बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर मोठा निर्णय दिला आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी मात्र नुकसान भरपाईची रक्कम किती असेल याचा निर्णय केंद्र सरकार घेईल. तसेच रक्कम किती देण्यात येईल हे ठरवुन ६ आठवड्यांच्या आता केंद्राने सांगावे असे निर्देशन सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.