पालघर दर्पण: वार्ताहर
विक्रमगड: किरवली ग्रामपंचयातीच्या हद्दीतील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ,वरले येथे रोटरी क्लब मुंबई 3141 यांच्या मार्फत नवजात बालकांसाठी उबदार बेड मशीन तसेच इतर साहित्य देण्यात आले त्याच बरोबर किरवली येथील काही पाड्यांना मिनी नळयोजना देखील सुरू करण्यात आल्या.
किरवली ग्रामपंचायतीमध्ये काही पाड्यांना असलेली पाण्याची समस्या लक्षात घेऊन येथील उपसरपंच अल्पेश पाटील यांनी रोटरी क्लब मुंबई यांच्याशी संपर्क साधून त्यांनी आपली समस्या त्यांच्यापुढे मांडली. त्यानंतर रोटरी क्लबच्या काही सदस्यांनी पाहणी करून येथील काही पाड्यांना मिनी नळयोजनेसाठी निधी उपलब्ध करून देत सदर नळयोजना बांधून दिली. त्याचा बरोबर प्राथमिक उपकेंद्र वरले येथे नवजात बालकांसाठी उबदार बेड, सौर उर्जेवरील इन्व्हर्टर बॅटरी, एचबी मॉनिटर मशीन, बीपी मॅन्युअल उपकरणे,पिण्याचे वॉटर कूलर आणि फिल्टर प्लास्टिक खुर्च्या इत्यादी साहित्य भेट दिले भेट दिले.
किरवली येथील ठाणगेपाडा , धानवापाडा, धडपेपाडा या तीन पाड्यांना रोटरी क्लब मुंबई यांच्या वतीने मिनी नळयोजना देण्यात आल्या असून या मिनी नळ योजनांमुळे महिलांची होणारी पायपीट थांबणार असून त्यांचा वेळही वाचणार आहे. त्यामुळे येथील महिलांनी रोटरी क्लब आणि उपसरपंच अल्पेश पाटील आभार मानले. तर प्राथमिक आरोग्य केंद्रात दिलेल्या साहित्यामुळे अनेक रुग्णांवर इथेच उपचार होऊ शकतात तसेच शिशु बालकाची काळजी देखील आत्ता इथे घेतली जाईल. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. वरले ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच अल्पेश पाटील यांच्या प्रयत्नांमुळे ग्रामपंचायतीमध्ये अनेक उपक्रम राबविण्यात येत असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या योजनांच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी रोटरी क्लबचे प्रकाश रुईया, सुनिल मेहरा, चंद्रमोहन डावर, जयकुमार गुप्ता, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय बुरपुल्ले, डॉ. अनिल गवारी ग्रामसेवक चंदू ठाकरे, आरोग्य सेवक प्रभाकर भेरे यांच्यासह रोटरी क्लबचे अनेक मान्यवर हजर होते.