पालघर दर्पण: प्रतिनिधी
बोईसर: शहरात करोना काळात सार्वजनिक सेवा देणाऱ्या व भर पावसात बसून आपलं उदरनिर्वाह करणाऱ्या मच्छी विक्रेता महिलांना शिवसेनेचे कुंदन संख्ये यांच्या वतीने छत्र्यांचे वाटप करण्यात आले. जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण व बोईसर विभागातील जेष्ठ शिवसैनिक राजेंद्र ठाकूर यांच्या हस्ते छत्री वितरण करण्यात आले.
बोईसर येथील ओव्हर ब्रीज लागत बसणाऱ्या मच्छी विक्रेता महिलांना छत्री वाटप करण्यात आली असुन पालघर जिल्ह्यात आपली सेवा देणाऱ्या सर्व क्षेत्रातील व्यक्तींना व गावापड्यातील ५००० कुटुंबियांना छत्री वाटप करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कुंदन संख्ये यांनी सांगितले. या दरम्यान शिवसेना उपतालुका प्रमुख वैभव भोईर, शिवसेनेचे सरावली ग्रामपंचायतीचे उपसरपंच अशोक साळुंके, कुंभवली ग्रामपंचायत सदस्य काशीनाथ संखे, मंगेश राऊत, योगेश राऊत उपस्थित होते.