◾स्फोटात पाच कामगार होरपळून जखमी असल्याची प्राथमिक माहिती
पालघर दर्पण: प्रतिनिधी
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणकारी भारत केमिकल प्लाँट नंबर एल 13 व एल 30 या कारखान्यात स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कारखान्यात शनिवारी रात्री 9: 30 च्या झालेल्या स्फोटात पाच कामगार जखमी झाल्याची घटना घडली आहे.
स्फोटा नंतर कोलवडे येथील स्थानिक युवकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून घटनेची माहिती देण्यासाठी कारखाना व्यवस्थापक टाळाटाळ करत असल्याचे दिसून आले होते. जखमी कामगारांवर बोईसर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून दोन कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे.