◾ बोईसर चिल्हार रस्त्यावर नैसर्गिक नाल्यावरील पुलांकडे दुर्लक्ष; अर्धवट कामामुळे अपघातात वाढ
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रात येणाऱ्या मुख्य रस्त्यांच्या कामाचे तुकडे पाडून मुख्य ठेकेदाराने दिलेल्या पोट ठेक्यामुळे रस्त्यांचे बारा वाजले आहेत. अनेक भागात या पोट ठेकेदाराने रस्त्याची कामे अर्धवट ठेवल्याने अपघातांना निमंत्रण मिळत असून काही दिवसापूर्वीच या ठेकेदाराच्या बेजबाबदार पणामुळे एक प्रवासी वाहतूक करणारी कार थेट अपुर्ण काम ठेवलेल्या नाल्यात पडल्याची घटना घडली होती. मात्र तरीही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पोट ठेकेदाराला जबाबदार देखील भरले नाही.
बोईसर चिल्हार रस्त्यावर मुख्य ठेकेदाराने एका पोट ठेकेदार म्हणून वीयूबी नामक कंपनीला काम दिले आहे. चौपदरीकरणाच्या कामात अनेक भागात कामाचे तुकडे करून वीयूबी या कंपनीचे काम सुरू असून या कंपनीच्या अंतर्गत येणारी जवळपास सर्वच कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. विशेष म्हणजे या कंपनीच्या बेजबाबदार कामाकडे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळे देखील दुर्लक्ष केल्याने ठेकेदाराचे देखील फावत चालले आहे. बोईसर ते चिल्हार पर्यंत गटाराचे काम देखील या ठेकेदाराने अपुर्ण ठेवले असून याभागात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचलेले असते. मागील काही दिवसापुर्वी खैरापाडा येथील नैसर्गिक नाल्यावर सुरू असलेल्या लहान पुलाचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत असल्याने एक प्रवासी वाहतूक करणारी कार थेट नाल्यात पडल्याचा प्रकार घडला होता. वीयूबी या कंपनीच्या गलथान कारभारामुळे रस्त्यावरील प्रवास धोकादायक बनला असून या कंपनीवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने मेहरबानी असल्याचा आरोप नागरिकांन कडून केला जात आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी नियमबाह्य काम व वीयूबी सारख्या पोट ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याने याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी वारंवार संपर्क साधून देखील कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
◾मुख्य रस्त्यावरील नागझरी याठिकाणी देखील हाच पोट ठेकेदार काम करत असून मागच्या दोन वर्षापूर्वी देखील या मुख्य रस्त्यावर खोदकाम करून लाखो ब्रास माती बेकायदेशीर पणे विक्री करण्यात आली होती. याठिकाणी उंच असलेला भाग खोदकाम करून याठिकाणी असलेल्या मातीची चोरी झाली की माती कोट्यवधी रूपयाला विक्री केली याबाबत अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत. मान भागात देखील या ठेकेदाराने बेकायदेशीर पणे काम केले असून परवानगी नसलेल्या कामांचे देय देखील दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
◾ सुर्यानदी जुन्या पुलावर पडलेले खड्डे व नवीन पुल उभारणी होईपर्यंत जुन्या पुलाचा डागडुजी करणे ठेकेदाराला बंधनकारक होते. मात्र मुख्य ठेकेदाराने पोट ठेकेदाराला ठेका दिल्याने वीयूबी या कंपनीने एकदाही वेवस्थीत पणे जुन्या पुलावरील खड्ड्याची दुरूस्ती करण्यात आलेली नव्हती. मात्र तरीही येथील पुलाच्या दुरूस्ती बाबत लाखो रूपयाचा निधी खर्च केल्याचे समोर आले आहे.