◾ विराज प्रोफाइल व स्टील उद्योकांने शेती लगत असलेल्या जागेत लावली आम्लयुक्त राखेची विल्हेवाट
◾25 एकर जागेवर विराजचा गोरखधंदा सुरू; बँग हाऊस डस्ट ची देखील साठवणूक केली जाते अँसिडक राख
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणासाठी अग्रेसर असलेल्या एका स्टील निर्मिती उद्योजकांने औद्योगिक क्षेत्रा बरोबर आजूबाजूचा परिसर देखील प्रदूषित केला आहे. याठिकाणी असलेल्या शेतीलगत जागेमध्ये कारखान्यातील आम्लयुक्त राखेचा व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील रासायनिक गाळाची विल्हेवाट लावली जात आहे. मात्र नागरीकांनी अनेक तक्रारी करून देखील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या गंभीर विषयाकडे नेहमी प्रमाणेच दुर्लक्ष केले आहे.
तारापूर देशात सर्वात जास्त प्रदूषित भाग असल्याचा नेमका गर्व येथील प्रशासनला आहे का हा सवाल उपस्थित होत आहे. याचे कारण देखील तसेच असून औद्योगिक क्षेत्रातील विराज प्रोफाइल उद्योग समुहाने येथील पर्यावरणाची पुर्ण वाट लावली असून हवे बरोबर येथील जमीन देखील प्रदूषणकारी केली आहे. या उद्योजकांने आपल्या कारखान्यातुन लोखंडावर प्रक्रिया केल्यानंतर निघणारी चुना राख व बँग हाऊस डस्ट याची विल्हेवाट लावण्यासाठी बोईसर पुर्वेकडील बेटेगाव येथे 25 एकर जागा घेतली होती. याच ठिकाणी नियम धुडकावून मोठ्या प्रमाणात राखेची व बँग हाऊस डस्टची साठवणूक करण्यात आली असून ही घातक राख हवेत उडून आजूबाजूला असलेल्या गावात जात आहे. परिणामी नागरीकांचे आरोग्य देखील धोक्यात आले असले तरी स्थानिक प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरीकांन कडून केला जात आहे.
विराज प्रोफाइल व त्यांच्या सर्व कारखान्यातुन दिवसाला 450 टन चुना राख निघते. तसेच 80 टन बँग हाऊस डस्ट ही आम्लयुक्त राख निघत असून याची विल्हेवाट लावण्यासाठी मुंबई वेस्ट मँनेजमेंट कडे पाठवणे बंधनकारक असते. मात्र येथील लाखोची प्रक्रिया वाचविण्यासाठी उद्योजकांने याच ठिकाणी लाखेची विल्हेवाट लावण्यासाठी सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे याठिकाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून निघणाऱ्या आम्लयुक्त गाळाचा देखील समावेश आहे. विराज उद्योजकांने घेतलेल्या 25 एकर जागेवर सद्यस्थितीत सुमारे 30 लाख टन राखेचा साठा करण्यात आला असून या नियमबाह्य साठ्याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. यामुळे प्रदूषकारी उद्योजकांचे फावत चालले असून तारापुरच्या प्रदूषणात अधिक भर करणाऱ्या कारखान्यावर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांन कडून केली जात आहे.
◾ विराज उद्योजकांने बेकायदेशीर पणे साठवून ठेवलेली राख पिसून त्याची विक्री सिमेंट कंपनीला करण्यासाठी एक प्रकल्प याठिकाणी उभारला आहे.
या प्रकल्पाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मान्यता दिली असली तरी प्रकल्प सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी अद्याप दिलेली नाही.
तसेच आता पुन्हा नवीन प्रकल्प देखील याठिकाणी बांधला जात असून ग्रामपंचायतीने बांधकाम परवानगी दिली नसताना देखील याठिकाणी नवीन प्रकल्प उभारण्यात येत आहे.