◾ प्लॅस्टिक वापर टाळावा यासाठी शिवसेनेची जनजागृती
पालघर दर्पण: प्रतिनिधी
बोईसर: शासनाने प्लॅस्टिक बंदी केली असताना देखील बोईसर शहरात प्लास्टिक चा वापर होत असल्याने याबाबत जनजागृती म्हणून बोईसर मध्ये शिवसेनेकडून कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. येथील शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य यांनी आपल्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा अभिनव उपक्रम सुरू केला असून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पर्यावरण बाबत सुरू असलेले प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली. यावेळी महिला भाजीपाला विक्रेत्यांना छत्र्या व महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना रेनकोट चे वाटप करण्यात आले.
बोईसर शहरात आपल्या जन्मदिवसाच्या निमित्ताने शिवसेनेचे शहर प्रमुख व माजी पंचायत समिती सदस्य मुकेश पाटील यांनी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळावा यासाठी उपक्रम हाती घेतला आहे. त्यांनी शुक्रवारी 9 जुलै रोजी कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. साधारण पाच हजार कापडी पिशव्यांचे वाटप आठवडा भर केले जाणार आहे. यावेळी बोईसर भागात भाजी विक्रेत्या महिलांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण, उपजिल्हा प्रमुख निलम संखे, शिवसेनेचे जिल्हा परिषदेतील गटनेते जयेंद्र दुबळा,माजी उपसभापती मनोज संखे, कल्पेश पिंपळे, बोईसर ग्रामपंचायत सदस्य परशुराम दुमाडा, माजी उपसरपंच राजेश करवीर, विक्रम धोडी, शैलेश मोरे, राहुल मोरे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.