◾ सहा महिन्यानंतर बंद केलेला कारखाना पुन्हा सुरू; दोन दिवसातच सुरक्षतेचे कारण देत सुरू केला प्रदुषणकारी कारखाना
पालघर दर्पण: विषेश प्रतिनिधी
बोईसर: देशातील सर्वात प्रदुषणकारी असलेल्या तारापुर औद्योगिक क्षेत्रातील प्रदुषणकारी कारखान्यांवर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी मेहरबान असल्याने प्रदुषणकारी कारखान्यांना मोकळीक दिली जात आहे. यातच सहा महिन्यानंतर बंद करण्यात आलेला प्रदुषणकारी रामदेव केमीकल कारखान्याला सुरक्षतेचे कारण देत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने पुन्हा कारखाना सुरू करण्याचे आदेश दिल्याने प्रदुषण मंडळाचा गलथान कारभार समोर आला आहे.
औद्योगिक क्षेत्रातील रामदेव केमीकल कारखान्यांने आपला कारखाना ईपका लँबरोटरीला विकल्या नंतर कारखान्यातच्या परिक्षणावेळी शेकडो टन रासायनिक घातक घनकचरा मान हद्दीत नेण्यात आला होता. यावेळी बोईसर पोलिसांनी वाहनांचा पाठलाग करून काही वाहने ताब्यात घेतली होती. प्रदुषणाचा थपका ठेवत सहा महिन्यानंतर प्रदुषण नियंत्रण मंडळाने रामदेव केमीकल कारखान्याला बंद करण्याचे आदेश 13 मार्च 2020 रोजी दिले होते. मात्र त्यांची प्रत एका पत्रकारा कडुन संबंधित विभागाला 19 मार्च रोजी प्राप्त झाली होती. कारखाना बंद करण्याचे आदेश काढुन देखील त्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. मात्र राजकीय वरदहस्त असलेल्या प्रदुषणकारी कारखानदाराला 26 मार्च 2020 रोजी सुरक्षतेचे कारण देत 10 दिवस कारखाना सुरू करण्याचे आदेश दिल्याने प्रदुषण नियंत्रण मंडळाचा कारभारावर अनेक सवाल उपस्थित केले जात आहे.
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने प्रदुषणकारी रामदेव केमीकल कारखान्यावर कारवाई करण्यासाठी सुरूवाती पासुनच चालढकल केली असल्याचे दिसून आले होते. यातच सहा महिन्यानंतर कारवाई ची जाग आलेल्या प्रदुषण मंडळाने सुरक्षतेचे कारण देत कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी दिलेले परवानगी म्हणजे फक्त दबावाखाली येवुन घेतलेला निर्णय असल्याचा आरोप नागरीकांन कडुन केला जात आहे. मात्र महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण विभाग देखील तारापुर मध्ये सुरू असलेल्या महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अनागोंदी कारभारावर दुर्लक्ष करत असल्याने दिवसेंदिवस तारापुर अधिकच प्रदुषणकारी होत चालले आहे.
◾ केमिकल वाहतूक करणारा माफिया मोकाटच!
रामदेव केमिकल कारखान्यातुन रासायनिक घनकचरा बेकायदेशीर पणे वाहतूक करणारा केमीकल माफिया कृष्णा सिंग अजुनही मोकाटच आहे. या केमीकल माफिया औद्योगिक क्षेत्रातील सुमारे 70 कारखान्यातील रासायनिक घनकचरा विल्हेवाट लावण्यासाठी उचलत असल्याचे एका चित्रफितीत त्यांचे स्वतःच्या संभाषणामुळे उघड झाले आहे. असे असले तरी औद्योगिक क्षेत्रात मोकाट सुटलेल्या केमीकल माफियांच्या मुस्क्या बोईसर पोलिस नेमक्या कधी आवळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असुन केमीकल माफियांवर कारवाई होते हे पाहणे औचित्यांचे ठरणार आहे.