◾फार्मसीच्या NIPEP परीक्षेत देशात एकोणीसावा
पालघर दर्पण: वार्ताहर
विक्रमगड: वाडा तालुक्यातील सापणे बुद्रुक गावातील विनायक दत्तात्रेय पवार या कातकरी समाजातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील NIPEP (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च)-या परीक्षेत ST समाजाच्या प्रवर्गात देशात १९ वा क्रमांक मिळवत यश मिळवले आहे.
GPAT(ग्रॅज्युएट फार्मससी अॅप्टिट्यूड टेस्ट-२०२१ for MPHARM मध्ये ८८.६०% मार्क मिळविले. त्यामध्ये त्याचा ऑल इंडिया रँक ५१८५ इतका आला होता. या परीक्षेत साधारणतः ५०,००० परीक्षार्थी बसतात. आणि या परीक्षेत जे उत्तीर्ण होतात तेच विद्यार्थी NIPEP (National Institute of Pharmaceutical Education & Research)-JEE या परीक्षेत बसू शकतात. याने NIPEP या परीक्षेत बसून ST समाजाच्या रँकिंगमध्ये देशात १९ वा नंबर मिळविला आहे.
आत्ता विनायकला देशातील तीन टॉप कॉलेज मध्ये कुठेही प्रवेश घेता येणार असून त्याला महिन्याला 12 हजार 400 रुपये शिष्यवृत्ती देखील मिळणार आहे. विटभट्टीवर जाणारी भटकी जमात म्हणून ज्या समाजाकडे बघितले जात होते त्या समाजातील मुले देखील आत्ता कात टाकू लागली असून प्रवाहाबरोबर राहून उच्च शिक्षण घेऊ लागली आहेत. त्यामुळे नक्कीच या समाजाला देखील एक दिशा मिळू लागली आहे.
सापणे बुद्रुक येथील रविंद्र भुरकुंड या तरुणाची PHD साठी निवड झाली असून ती कातकरी समाजातील पहिली PHD करणारी वेक्ती आहे. त्याच्याच पावलावर पाऊल टाकत त्याच गावातील विनायक पवार या तरुणाने देखील फार्मसी साठी प्रवेश मिळवत कातकरी समाजातील पबिला तरुण या क्षेत्रात पदवित्तर शिक्षण घेत आहे. अशा तरुणांमुळे नक्कीच मागास आणि भटक्या समाजातील तरुणांना प्रेरणा मिळून ते देखील शिक्षणात प्रगती साधून आपल्या समाजाला आर्थिक आणि सामाजिक बाबतीत पुढे नेत स्थेर्य देण्याचे काम करणार आहेत. विनायकच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
◾NIPEP (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च) म्हणजे काय..??
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (एनआयपीईआरएस) ही भारतातील औषधी विज्ञान संस्थेच्या राष्ट्रीय स्तरावरील संस्था आहे. भारत सरकारने एनआयपीईआरंना राष्ट्रीय महत्त्व देणारी संस्था म्हणून घोषित केले. ते फार्मास्यूटिकल्स विभाग, रसायने व खते मंत्रालयाच्या वतीने स्वायत्त संस्था म्हणून कार्यरत आहेत.