◾ इफेड्रिन हे अमली पदार्थ बनविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई; डीआरआयच्या मुंबई विभागाने केला 90 लाखाचे ड्रग्ज जप्त
पालघर दर्पण: विषेश प्रतिनिधी
बोईसर: तारापुर औद्योगिक क्षेत्र दिवसेंदिवस अमली पदार्थांचे क्रेंद्र बनत चालले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील अमली पदार्थांचा पुरवठा केला जात असल्याचे आजवर केलेल्या कारवाईतुन उघड झाले होते. यातच डीआरआयच्या मुंबई विभागाने औद्योगिक क्षेत्रातील एका कारखान्यात बनवल्या जाणाऱ्या इफेड्रिन ड्रग्ज हा अमली पदार्थ ताब्यात घेतल आहे. यामुळे पुन्हा एकदा तारापुर अमली पदार्थांचे उत्पादन घेणाऱ्या कारखान्यावर कारवाई करण्यात आली असुन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील में. जगदंबा केमिकल्स प्लाँट नं. टि 88 या कारखान्यात बेकायदेशीर पणे एनडीपीएस कायद्यांतर्गत नियंत्रित पदार्थ असलेल्या इफिड्रिनचे बेकायदेशीर उत्पादन घेतले जात होते. याबाबतची माहिती मिळताच डीआरआयच्या मुंबई विभागाने 17 मार्च 2020 रोजी कारखान्यात धाड टाकत कारवाई केली. यावेळी द्रव आणि स्फटिक स्वरूपात 483.53 किलोग्राम इफेड्रिन नावाचे ड्रग्ज ताब्यात घेतले असुन एनडीपीएस अधिनियम, 1985 अन्वये मादक द्रव्ये आणि सायकोट्रॉपिक पदार्थांविरूद्ध केल्या जाणाऱ्या कारवाई अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातच डीआरआयच्या मुंबई विभागाने केलेली ही दुसरी मोठी तारापुर मधील कारवाई असुन ड्रग्ज या घातक मादक पदार्थांचे तारापुर मुख्य क्रेंद्र बनत चालले आहे.
तारापुर येथील जगदंबा केमिकलमध्ये कारखान्यात गेल्या अनेक दिवसापासून घातक अमली पदार्थांचे उत्पादन घेतले जात होते. याठिकाणी डीआरआयच्या मुंबई विभागाने केलेल्या कारवाईत 89 लाखांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. डीआरआयने दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक चौकशीत असे निष्पन्न झाले आहे की, कारखानदारांने एक अद्वितीय मोडस-ऑपरेंडी विकसित केली होती. या फॅक्टरीच्या जागेवर ते जॉब वर्क करित असल्याचे दाखविले जात होते. बोईसर चित्रालय भागातील रवी सिंग हा अमली पदार्थांचे जाँबवर्क करून घेत असल्याची माहिती कारखान्यातील सुरक्षा रक्षका कडुन मिळाली पदार्थातच अमली पदार्थांचे उत्पादन घेणारा व मुख्य सुत्रधार कारखान्याचा व्यवस्थापक भुपेश पाटील हा फरार आहे.
तारापुर मध्ये घेतले जाणारे अमली पदार्थाचे उत्पादन यापुढे कोल्हापूर जिल्हातील चंदगड जवळील दुर्गम भागातील शेत जमीनीत प्रकल्प लावून घेण्याची तयारी सुरू होती. यासाठी त्यांनी या ठिकाणी एक प्रयोगशाळा सुध्दा तयार केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या ठिकाणी हि काही प्रमाणात इफिड्रीन सापडले असल्याचे डीआरआयने सांगितले आहे. कारखाना मालक प्रदीप टोकाडे, रवि सिंग व अमली पदार्थ विकत घेणारा राकेश खानीवडेकर यांना अटक करण्यात आली असुन प्रकरणाचा अधिक तपास डीआरआय मुंबई विभाग करित आहे. यातच तारापुर औद्योगिक क्षेत्रात काही कारखानदार बेकायदेशीर पणे चोरटी उत्पादन घेत असल्याने अशा कारखान्यांंची तपासणी करणे आवश्यक आहे. विविध औषधांच्या नावाखाली अमली पदार्थांचे उत्पादन घेणारे आजही तारापुर मध्ये आपले उत्पादन घेत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
अमली पदार्थांची याअगोदरचे तारापुर कनेक्शन
◾ १६ मे 2018 रोजी पाथर्डी फाटा परिसरातून नाशिक गुन्हे शाखाेच्या पथकाने एका सफारी कारमधून प्रवास करणाऱ्या तिघांकडून २६५ ग्रॅम एमडी ड्रग्ज हस्तगत केले होते. त्यानंतर तपास केल्यानंतर बोईसर येथील एका राहत्या घरात अमली पदार्थांची निर्मिती केली जात असल्याचे उघड झाले होते. यातच प्रकरणातील मुंबई लोखंडवाला भागातून देखील अमली पदार्थांचा साठा व आरोपींना अटक करण्यात आली होती.
◾तारापुर औद्योगिक क्षेत्रातील मिनार केमीकल टी- 68 याठिकाणी छापा टाकुन अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला होता.
◾पालघर तालुका औद्योगिक वसाहतीत रेनबो पेंट्स या कारखान्यांच्या आवारात जागा भाड्याने घेवुन अमली पदार्थांचे उत्पादन घेतले जात असल्याचे कारवाई नंतर उघड झाले होते.