पालघर दर्पण, प्रतिनिधी
सध्या ची परिस्थिती पाहता ऑक्सिजन ही काळाची गरज आहेे. हीच गरज लक्षात घेऊन विरार येथील विवा महाविद्यालयातील एनएसएस युनिट च्या स्वयंसेवकांनी वसईतील थळ्याचा पाडा (आडणे भाताणे) येथे जाऊन वृक्षारोपण केले आहे.
विवा महाविद्यालयातील एनएसएस युनिटच्या स्वयंसेवकांनी थळ्याचा पाडा येथे जाऊन १४२ रोपांची लागवड केली आहे. या रोपांची योग्यती निगा राखली जावी यासाठी ही रोपं थळ्याचा पाडा येथील स्थानिक शेतकरी निलेश जाधव यांच्या शेतीच्या बांधावर लावण्यात आली. लावण्यात आलेली सर्व रोपं ही केसरी आंब्याची आहेत. केसरी आंब्याची रोप लावल्याने निदान व्यवसायिक दृष्टीने तरी या सर्व रोपांची योग्य ती निगा राखली जाईल या हेतूने एनएसएस युनिटच्या स्वयंसेवकांनी १४२ केसरी आंब्याच्या रोपांची लागवड केली. त्याच बरोबर कोविडचा वाढता प्रभाव लक्षात घेता. एनएसएस युनिटचे फक्त १० स्वयंसेवक वृक्षारोपणासाठी गेले होते. व युनिट मधल्या उर्वरित सर्व स्वयंसेवकांनी आपल्या घरी रोपांची लागवड केली.