◾बोईसर पोलिसांची गुटखा तडजोड उघड; चित्रालय भागात मारलेल्या छाप्यात गुटखा तस्कराला सोडले मोकाट
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: वर्षभरात दोन वेळा लाचलुचपत विभागाने कारवाई करून सुध्दा सुधारण्याच्या मनस्थिती नसलेल्या बोईसर पोलिसांचा आजून एक तडजोडीचा प्रकार समोर आला आहे. बोईसर पोलिस ठाणे हद्दीतील चित्रालय भागातील एका गुटखा विक्री करणाऱ्यांच्या गोडाऊन वर गुरूवारी रात्री उशिरा छापा मारण्यात आला. मात्र याठिकाणी रात्रीच पहाटे पर्यंत तडजोड करून या गुटखा विक्री करणाऱ्या माफियाला सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे यामध्ये मोठी तडजोड झाल्याचे समोर आले असून पोलिसांन सोबत दोन इसमांनी हे कामकाज तडीस लावले आहे.
बोईसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चित्रालय जमुना टाँकीज गल्लीत असलेल्या एम. के. सुपारी या तंबाखू पदार्थ होलसेल भावाने विक्री करणाऱ्यांच्या गोडाऊन मध्ये गुटखा साठा असल्याची चित्रालय चौकीवर असलेल्या पोलिसांना दोन इसमांन कडून प्राप्त झाली होती. यामध्ये अधिक माहिती अशी की, गुरूवारी रात्री साधारण 12 वाजताच्या सुमारास बोईसर मधील दोन इसम यातील एक स्थानिक युट्यूब चालवणारा हे चित्रालय येथील एम.के. सुपारी नावाच्या होलसेल दुकानाचे शटर वाजवून शटर खोलण्याचा प्रयत्न करत होते. खात्रीलायक सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दुकानाच्या मध्ये दुकान मालक असल्याने त्यांने शटर खोलण्यासाठी नकार दिला. त्यानंतर या दोन्ही इसमांनी चित्रालय पोलिस चौकीवर तैनात असलेले पोलिस नाईक थालेकर यांना बोलवून घेतले. शुक्रवारी पहाटे एक वाजताच्या सुमारास पोलिस याठिकाणी आल्यानंतर त्यांनी दुकानाचे शटर खोलले. याचवेळी याठिकाणी मोठ्या प्रमाणात गुटखा साठा असताना देखील कोणत्याही प्रकारची कारवाई न करता रात्रीच्या वेळीच तडजोड करून प्रकरण मिटवून टाकले होते.
बोईसर भागात रात्रीच्या वेळी गुटखा तस्करा सोबत पोलिसांनी तडजोड केल्याची माहिती पालघर दर्पणला शुक्रवारी दुपारी 1:30 वाजता आपल्या खात्रीलायक सुत्रांकडून प्राप्त झाली. त्यानंतर पालघर दर्पणच्या विशेष टिमने याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत तपासाची चक्रे फिरवली. यावेळी हा तडजोडीचा धक्कादायक प्रकार हा दुपारी 2 वाजता म्हणजे अवघ्या अर्धातासात समोर आला. याबाबत अधिक माहिती साठी रात्रीच्यावेळी कारवाई साठी गेलेल्या पोलिस नाईक थालेकर यांना त्यांच्या दुरध्वनी वर संपर्क साधून विचारले असता त्यांनी सांगितले की, फोन आल्या नुसार मी त्याठिकाणी गेलो शटरला लाँक लावले आहे. चावी माझ्या कडे असून कारवाई काही झाली नसल्याचे मान्य केले. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी केलेल्या कारवाई दरम्यान गुटखा होता का असे विचारले असता गुटखा असणार शटर नाही उघडून पाहिले असे उडवा उडवीचे उत्तर देत तुम्ही साळुंखे साहेबांन सोबत बोलून घ्या असे सांगतल्याने गुटखा प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश साळुंखे देखील असल्याचे उघड झाले आहे. याबाबत सुरेश साळुंखे यांना वारंवार संपर्क साधून देखील त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.