कार सह 3 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त
राजतंत्र: वार्ताहर
पालघर: स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिट कडून मुंबई अहमदाबाद महामार्गावर अवैद्य गुटखा वाहतूकिवर कारवाई करण्यात आली आहे.मंगळवारी 3 आँगस्ट रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास पोलिसांनी केलेल्या कारवाईत आवंढाणी ग्रामपंचायत हद्दीतील अकसा हॉटेल समोर आर्टिगा कार मधून गुटखा जप्त करण्यात आला आहे.याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आसिफ मेमन उर्फ पिलू या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गावर आवंढाणी ग्रामपंचायत हद्दीत गुटख्याची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी महामार्गावरील अकसा हॉटेलसमोर सापळा रचला होता.सायंकाळी सात वाजताच्या सुमारास एमएच 48 एसी 2422 क्रमांकाच्या आर्टिगा कारची तपासणी केली असता कार मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला पान मसाला आणि सुगंधी सुपारी असलेला तंबाखू युक्त गुटखा आढळून आला. कारवाईत गुटखा आणि कारसह 3 लाख 69 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी कार चालकावर भारतीय दंड विधानाच्या कलम 328,188,272,273 आणि 34 आणि अन्न सुरक्षा मानदे कायदा 2006 आणि2011 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीला अटक करण्यात आहे. कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटचे पोलीस उप निरीक्षक आशिष पाटील आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे.
■मनोर परिसरात आसिफ मेमन उर्फ पिलू आणि नाझीम सिद्दिकी यांच्या मार्फत गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गुटखा आणला जातो. त्यांच्या मार्फत किरकोळ विक्री करणाऱ्या स्थानिक विक्रेत्यांना गुटखा उपलब्ध करून दिला जातो.गेल्या काही वर्षापासून गुटख्याच्या अवैद्य व्यवसायातुन दोघांनी मोठी माया कमावली आहे.दोघांकडून स्थानिक पोलीस ठाण्यात मोठा आर्थिक व्यवहार होत असल्याने पोलिसांकडून त्याच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप नागरिकांन कडून केला जात आहे.