पालघर दर्पण: विषेश प्रतिनिधी
पालघर: करोना विषाणूशी मुकाबला करण्यासाठी आमदार निधीतून 10 लाखाचा निधी डहाणू विधानसभा मतदार संघातील आरोग्य सोयी आणि सविधांसाठी देण्याची पत्र आमदार विनोद निकोले यांनी पालघर जिल्हाधिकारी यांना इमेल द्वारे पाठवले आहे.
विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात तसेच महाराष्ट्रात कलम 144 अन्वये संचार बंदी लागू करण्यात आली. भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) आणि इतर डाव्या पक्षांच्या पश्चिम बंगाल मधील सर्व आमदारांनी प्रत्येकी 10 लाख ही रक्कम आपल्या मतदार संघातल्या आरोग्य व्यवस्थेसाठी दिली आहे. त्याच प्रमाणे डहाणू विधानसभा मतदार संघात देखील आमदार निकोले यांनी आरोग्य सोयी आणि सुविधा सुधारण्यासाठी 10 लाखाची रक्कम दिली आहे. कोरोना विषाणू संदर्भात आमदार निधीतून 10 लाख देणारे विनोद निकोले हे महाराष्ट्रातील पहिले आमदार असून त्यांचे सर्व स्तरांतील नागरिक धन्यवाद व्यक्त करत आहेत.