पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन १ ऑगस्ट इ.स. २०१४ रोजी निर्मित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील ३६ वा जिल्हा म्हणुन निर्माण झालेल्या जिल्ह्याचे मुख्यालय पालघर शहरच आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत नवीन जिल्ह्याच्या कामकाजास १ ऑगस्ट २०१४ पासून सुरुवात झाली. पालघर हा राज्यातील ३६ वा जिल्हा असुन कोकणच्या उत्तर भागास असलेला पालघर जिल्हा पुर्वेकडे असणार्या सहयाद्री पर्वत रांगा व पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या किनारपट्टी दरम्यान पसरला आहे. पालघर जिल्हाची एकूण लोकसंख्या २९,९०,११६ एवढी आहे. पालघर जिल्ह्यात एकूण ८ तालुके आहेत त्यामध्ये जव्हार, मोखाडा, तलासरी, वसई, विक्रमगड, पालघर, डहाणू आणि वाडा तालुक्यांचा समावेश आहे़.
जिल्ह्यात एकूण १००८ गावे व ३८१८ पाडे आहेत. तसेच ४७७ ग्रामपंचायती आहेत.पालघर जिल्हातील साक्षरतेचे प्रमाण ६६.६५% आहे. त्यामधील पुरूषांचे प्रमाण ७२.२३% इतके आहे तसेच महिलांचे प्रमाण ५९.२८% इतके आहे.
विभाग: कोकण विभाग
मुख्यालय: पालघर
तालुके: वसई , वाडा , जव्हार, मोखाडा, पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड
क्षेत्रफळ: ५,३४४ चौरस किमी (२,०६३ चौ. मैल)
लोकसंख्या: २९,९०,११६ (२०११ जनगणनेनुसार)
लोकसंख्या घनता: ५६० प्रति चौरस किमी (१,५०० /चौ. मैल)
महानगरपालिका: वसई-विरार महानगरपालिका
नगरपरिषदा: डहाणू,जव्हार,पालघर
नगरपंचायती: तलासरी,मोखाडा, विक्रमगड,वाडा
प्रथम जिल्हाधिकारी: अभिजीत सुधाकर बांगर
प्रथम मुख्य कार्यकारी अधिकारी: डॉ. विजय सूर्यवंशी
प्रथम जिल्हा परिषद अध्यक्षा: सुरेखा विठ्ठल थेतले