◾ बोईसरचे वातावरण भंग करणाऱ्या गुंडांना बोईसर पोलिसांची मोकळीक
◾ पोलिस उपनिरीक्षक संदीप पाटील यांच्या कडून कर्तव्यात कसूर
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: निवडणूक आचारसंहिता असताना बोईसर मध्ये गावगुंडांनी राडा केला असून एका शिवसेनेच्या कार्यकर्तांला बेदम मारहाण करण्यात आली आहे. बोईसर हार्मोनी येथे शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला असून बेदम मारहाण सुरू असताना गावगुंडांच्या तावडीतून सुटलेल्या इसमाने येथून पळ काढला मात्र मारहाण करणाऱ्या टोळीने त्यांचा पाठलाग सुरूच ठेवला होता. हा संपूर्ण गंभीर प्रकार बोईसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला असून पोलिसांनी कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली नाही. यासंपूर्ण प्रकारात पोलिस उपनिरीक्षक संदीप पाटील यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे दिसून आले आहे.
सरावली पंचायत समितीची पोटनिवडणूक सुरू असल्याने प्रचारात रंगत आली आहे. यामुळे सायंकाळी अनेक कार्यकर्ते वेगळ्याच नशेत असतात. मात्र यामुळे बोईसरची शांतता भंग होत असून पोलिसांनी देखील याकडे दुर्लक्ष केले आहे. असाच प्रकार बोईसर मध्ये घडला असून शिवसेनेचा कार्यकर्ता व अशोक शाळुंके यांचा खंदा समर्थक असलेला अमोल पाटील हा हार्मोनी येथे असलेल्या लिवींग लिकर या वाईन शाँप समोर शुक्रवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास आला होता. यावेळी त्याठिकाणी कार मध्ये असलेल्या चिराग पाटील, कृष्णा चव्हाण, प्रतिक गावड, संदेश व नौशाद नावाच्या गुंडगिरी करणाऱ्या इसमांनी अमोल याला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. मारहाण करणारे दारूच्या नशेत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. यावेळी आपला बचाव करत जिव वाचविण्यासाठी अमोल त्या ठिकाणाहून धावत धावत जाऊ लागल्यावर ओस्तवाल,- पिंक सिटी- बिग बाजार या मार्गांने चिराग पाटील यांच्या टोळीने पाठलाग केला. याच वेळी बिग बाजार येथून समोरून आलेल्या दुचाकी थांबवून अमोल पाटील हा गुंडांन कडून वाचण्यासाठी ओस्तवाल येथे असलेल्या भाजपचे अशोक वडे यांच्या बंगल्याच्या आवारात प्रवेश केला. यानंतर गुंडगिरी करणारे चिराग पाटील व त्यांचे साथीदार त्याठिकाणाहुन पळून गेले.
शिवसेनेच्या पदाधिकारी यांना अमोल यांनी फोन केल्यानंतर ओस्तवाल येथे शिवसेनेचे मुकेश पाटील आदी उपस्थित झाले होते. यानंतर संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी सर्व बोईसर पोलिस ठाण्यात दाखल झाले. यावेळी बोईसर पोलिस ठाण्यात शिवसेनेचे निलम संखे, अशोक शाळुंके, अशोक पाखरे यांच्या सह पोलिस ठाणे आवारात 40 ते 50 जनांची उपस्थिती होती. आचारसंहिता असताना बोईसर मध्ये वातावरण खराब करणाऱ्या टोळीवर बोईसर पोलिसांनी कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली नसून बोईसर पोलिसांनी फक्त तिन लोकांवर एनसीआर दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे फिल्मी टाईलने मारहाणी व दहशत दाखविण्याचा प्रकार घडला असताना देखील या संपूर्ण प्रकाराची चौकशी करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक संदीप पाटील यांनी प्रकरण त्याच ठिकाणी दाबून आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचे दिसून आले आहे. यामुळे बोईसर पोलिसांचा आणखी एक प्रताप समोर आला असून अशा अधिकाऱ्यांन मुळे बोईसर मध्ये गुन्हेगारी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
◾ गुंडगिरी करणारे चिराग पाटील हा आपल्या सोबत काही टवाळखोर मुलांना सोबत घेवून अनेकदा मारहाणी करत असतो. अनेकदा त्याच्यावर बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. अशा गुंडगिरी करणाऱ्यांन मुळे बोईसरचे वातावरण खराब होत असताना देखील तडजोडीत मग्न असलेले बोईसर पोलिस कधी ठोस कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
◾ बोईसर पोलिसांनी चिराग पाटील, कृष्णा चव्हाण, प्रतिक गावड या तिघांवरच एनसीआर दाखल करून प्रकरण त्यांच ठिकाणी दाबले, आचारसंहिता असताना झालेली गुंडगिरी व पोलिसांनी घेतलेली बघ्यांची भुमिका याबाबत अधिक माहिती विचारण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक संदीप पाटील यांना संपर्क साधला असता त्यांनी याबाबत बोलताना सांगितले की, झालेल्या प्रकाराबाबत तिघांवर एनसीआर दाखल केला आहे. मारहाण करताना तिनच लोक होते. आणि बाकी सोडविण्यासाठी गेले होते. तसेच याबाबत चौकशी सुरू असल्याचे उत्तर दिले.