◾ मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विरारजवळील मांडवी येथे झाला भिषण अपघात; अपघातात पाच मजुरांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी
पालघर दर्पण: विषेश प्रतिनिधी
पालघर: लाँकडाऊन असल्याने करोनाच्या भितीने गुजरातला पायी चालत जाणाऱ्यासाठी निघालेल्या सात जणांना एका भरधाव आलेल्या मालवाहू ट्रकने चिरडले आहे. राष्ट्रीय महामार्गावर विरारजवळील मांडवी येथे झालेल्या भीषण अपघात पाच मजुरांचा जागीच मृत्यू झाला असुन दोघांवर उपचार सुरू असुन त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
पालघर जिल्ह्यात परराज्यातील लाखो कामगार कामासाठी येतात. बांधकाम क्षेत्रात मजुरी करणाऱ्या कामगारांची संख्या देखील मोठी आहे. करोना मुळे संचारबंदी असल्याने सर्व ठिकाणी असलेली कामे बंद झालेली आहेत. यामुळे जवळ अन्य खाण्यासाठी देखील पैसे नसल्याने हजारो कामगार पायी आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघाले होते. यातच गुजरातची सीमा बंद असल्याने पोलिसांनी कामगारांना माघारी परतण्याचे आव्हान केले. यावेळी पुन्हा वसई च्या दिशेने माघारी परतत असलेल्या सात जणांना मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विरार हद्दीत चालत असताना भरधाव वेगाने आलेल्या मालवाहू ट्रकने उडवले. यामधील पाच मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात गंभीर जखमी असलेल्या दोघांवर उपचार सुरू असुन त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतामधील दोघांची ओळख पटली असून इतरांची ओळख अद्याप पटलेली नाही. या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं कल्पेश जोशी (३२) आणि दुसरा मयांक भट (३४) अशी आहेत. अपघाता बाबत गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास विरार पोलीस करत आहेत.