◾ पोटनिवडणुकीत शिवशक्ती संघटनेच्या पाठिंब्यावर उमेदवार विजयी; संजय पाटील बनले बोईसरचे किंग मेकर
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत बोईसर भागात शिवशक्ती संघटनेच्या पाठींब्यांने उमेदवारांना विजय सहज शक्य झाला. राजकीय पक्षांचे नेते जरी आपला डंका वाजवत असले तरी निवडून आलेल्या उमेदवारांन मध्ये शिवशक्तीचा मोठा वाटा असल्याचे दिसून आले आहे. नवापूर, सालवड, सरावली व मान येथील निवडून आलेल्या उमेदवारांना संघटनेचा मोठा पाठिंबा होता. यामुळे येणाऱ्या काळात बोईसर मध्ये शिवशक्ती संघटना राजकीय पक्षांच्या नेत्यांना मोठे आव्हान ठरणार आहे.
शिवशक्ती संघटनेचा पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत विविध ठिकाणी विविध पक्षांना पाठिंबा दिला होता. संघटनेचे संजय पाटील यांनी नवापूरमध्ये तर आपलाच निष्ठावंत कार्यकर्ता मिलिंद वडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस मधून निवडणुकीत उभे केले होते. याठिकाणी शिवसेनेचे मोठे आवाहन असताना देखील आपल्या जनसंपर्कावर त्यांना निवडून आणले. पुर्वीचे सहकारी व पुन्हा संजय पाटील यांच्या सोबत आलेल्या सालवड येथील एस एन पाटील यांच्या कुटुंबातील मेघा पाटील यांना भाजपा मधून उमेदवारी शिवशक्ती संघटनेचे संजय पाटील यांनी उमेदवारी मिळवून दिली होती. याठिकाणी देखील शिवसेनेच्या बालेकिल्ला व जिल्हा परिषद अध्यक्ष वैदही वाढाण यांचे गाव असताना देखील याठिकाणी शिवसेनेचा मोठा पराभव भाजपचे उमेदवार मेघा पाटील यांनी केला असून याठिकाणी मोठा धक्का शिवसेनेच्या डजनभर नेत्यांना बसला आहे.
सरावली पंचायत समिती व सरावली (अवधनगर) या दोन्ही ठिकाणी शिवसेना विरूद्ध उभे असलेल्या भाजपच्या उमेदवारांना शिवशक्तीचा मोठा पाठिंबा होता. याठिकाणी संजय पाटील यांचे खंदे समर्थक नापेश संखे यांच्या पत्नी निर्मीती नापेश संखे यांना उमेदवारी देण्यात आली होती. याठिकाणी काही मतांच्या फरकाने भाजपचा उमेदवारांचा पराभव झाला असला तरी याठिकाणी पहिल्यांदा मिळालेली मतांची आकडेवारी येणाऱ्या काळात शिवसेनेच्या नेत्यांना आपले अस्तित्व धोक्यात आणण्यासाठी पुरेशी आहे. सरावली पंचायत समिती गणात वैभवी राऊत यांना प्रभाकर राऊत यांच्या हट्टापायी शिवसेनेच्या संपर्क प्रमुख रविंद्र फाटक यांनी उमेदवारी दिली मात्र याठिकाणी शिवशक्तीच्या पाठींब्यावर उभा असलेल्या भाजपाच्या रेखा सकपाळ यांचा दणदणीत विजय झाला. शिवसेनेचे पुर्वपार चालत आलेल्या सत्ताकारणाला धक्का बसला आहे.
शिवशक्ती संघटनेने मान येथील मनसेच्या उमेदवारांना देखील पाठिंबा दिला होता. येथील मनसेच्या उमेदवार तृप्ती पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. मनसेचे पदाधिकारी यांनी याबाबत संजय पाटील यांची भेट घेवून आभार व्यक्त केले. यातच सरावली येथील भाजपचे विजयी उमेदवार रेखा सकपाळ यांनी देखील संजय पाटील यांची भेट घेवून आभार मानले विशेष म्हणजे यावेळी सरावली गावातील शिवसेनेचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी उमेदवार मिलिंद वडे यांनी देखील आपल्या नेत्यांचे आर्शिवाद घेत शिवशक्ती संघटनेची ताकद दाखवली आहे. शिवशक्तीचे संजय पाटील हे या पोटनिवडणुकीत किंग मेकर झाल्याचे दिसून आले आहे. या संपूर्ण निवडणुकीत शिवशक्ती संघटनेचामोठा फटका शिवसेनेला बसला आहे. यामुळे येणाऱ्या काळात बोईसर भागात सेनेला मोठे आवाहन निर्माण झाले आहे.
◾ काय आहे संजय पाटलांचे सेनेला आवाहन…
मागणी 10 वर्षापूर्वी शिवशक्ती संघटनेच्या पाठींब्यावर शिवसेनलाउपसरपंच पद बोईसर मध्ये मिळाले होते. मात्र शिवसेनेत बोईसर मध्ये असलेले डजनभर नेते यामुळे त्यांचे पुढच्या वेळी सुत जुळु शकले नाही. मागच्या वेळी शिवशक्ती संघटनेने भाजप सोबत घरोबा केला आणि भाजपचे गल्लीतले कार्यकर्ते जिल्ह्यात पोचले. यावेळी मात्र झालेल्या निवडणुकीत संजय पाटील यांचे उमेदवार विविध पक्षांत उभे राहिले व निवडून आले असले तरी ते संजय पाटील यांच्या पँनलचे आहेत. मतांची आकडेवारी व बघता येणाऱ्या काळात शिवसेनेला आपले मतदार संघ अबाधित राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
◾ बोईसर शहरात शिवसेनेचे निलम संखे व मुकेश पाटील हे दोनच प्रमुख चेहरे असून त्यांची ताकद संजय पाटील यांच्या जोडीची असली तरी शिवसेना मध्ये प्रभाकर राऊळ व जगदीश धोडी या दोघांन सोबत निलम संखे व त्यांच्या सहकार्यांची दोन विरूद्ध दिशेला तोंडे आहेत. यामुळे याचा मोठा फटका पुढील येणाऱ्या निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.
◾बोईसर नगरपरिषद स्थापन बाबत हालचाली सुरू असून नगरपरिषदेची स्थापना झाल्यावर सालवड पास्थळ व सरावली या गावांचा जरी यामध्ये समावेश झाला तरी आताचे राजकीय गणित बघता शिवसेनेला नगरपरिषदेत जाण्यासाठी शिवशक्ती सोबत जवळीक करावी लागणार हे नक्कीच.