◾ जतीन संखे या फरार आरोपीला पोलिसांनी दिली मोकळीक; फरार असलेला संखे करतोय समाजमाध्यमांवर पत्रकारांचीबदनामी
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
पालघर: स्पा सेंटर मध्ये वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या आरोपीला राजकीय पाठबळामुळे पोलिसांनी मोकळीक दिल्याचे दिसून येत आहे. आठवडाभरापुर्वी विरार पश्चिमेकडील तिरुपती नगरमधील पूनम प्लाझा या इमारतीत अल्युर थाई स्पा सेंटर वर वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघड झाले होते. यातील आरोपी मालक हा फरार दाखविण्यात आला असला तरी हाच समाज माध्यमातून पोलिसांनी केलेली कारवाई व पत्रकारांनी घेतलेली बातमी खोटी असल्याचा कांगावा करत पत्रकारांची बदनामी करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे.
पालघर, बोईसर भागात स्पा सेंटर चालवणारा जतीन संखे यांच्या विरार पश्चिमेकडील तिरुपती नगरमधील पूनम प्लाझा या इमारतीत असलेल्या अल्युर थाई स्पा सेंटरवर काही दिवसापूर्वी अनैतिक मानवी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून वेश्या व्यवसायाचा धक्कादायक प्रकार समोर आणला होता. विरार येथील स्पा सेंटर मध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तीन हजार रुपये देऊन बोगस गिऱ्हाईक पाठवले होते. पोलिसांना खात्री झाल्यावर त्या ठिकाणी छापा टाकून आरोपींकडून बोगस गिऱ्हाईकाने दिलेले तीन हजार रुपये स्वीकारल्याचे आढळून आले होते. याबाबत अर्नाळा पोलिस ठाण्यात आरोपी प्रियेश सावंत व मालक जतीन संखे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र यातील मुख्य सुत्रधार मालक जतीन संखे हा फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. याबाबत वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर अचानक समाजमाध्यमांवर प्रकट झालेल्या जतीन संखे यांने पत्रकारांवर बेछूट आरोप करत स्वतः काही केले नसल्याचा कांगावा करू लागला होता.
बोईसर येथील अनेक समाजमाध्यमांवर जतीन संखे यांने पोलिसांनी केलेली कारवाई चुकिची दाखवत पत्रकार खोट्या बातम्या पसरवतात अशा प्रकारे चुकीचे संदेश पाठवु लागला होता. मुळात पोलिसांनी फरार दाखवलेला आरोपी अशा प्रकारे समाज माध्यमांवर सक्रिय असताना देखील हा आरोपी नेमका फरार आहे की, राजकीय दबावामुळे फरार दाखवला जातोय हा तपासाचा भाग आहे. बोईसर येथील शिवसेना विधानसभा या व्हाट्सएप ग्रुपमध्ये जतीन संखे यांनी स्वतः पत्रकारांन विरोधात संदेश टाकला होता. विशेष म्हणजे वेश्या व्यवसाय चालवणारा हा शिवसेनेचा कार्यकर्ता आहे का असा सवाल यामुळे उपस्थित राहत आहे. शिवसेनेच्या विधानसभा ग्रुप मध्ये जतीन संखे असल्याने खासदार राजेंद्र गावित यांचा हितचिंतक असल्याच्या बातमीवर या निमित्ताने शिक्कामोर्तब झाला आहे. बोईसर येथील स्थानिक भुमिपुत्र या व्हाट्सएप ग्रुपमध्ये देखील जतीन यांच्या हितचिंतकांनी आक्षेपार्ह संदेश टाकले होते. यातच पालघर जिल्ह्यातील मासवण येथील डॉक्टरांचा उजवा हात असलेल्या इसमाचा जतीन हा नातेवाईक असल्याने अशा आरोपीला अटक का केली नाही यामागचे पाठबळ आपल्याला समजून आले असेल.
◾टाळेबंदीत जतीन संखे यांच्या बोईसर येथील अल्यूर स्पा सलून मध्ये जनरेटर बंद खोलीत सुरू करून चोरट्या पद्धतीने कामकाज चालवत असताना याठिकाणी काम करत असलेल्या तिन महिला बेशुद्ध झाल्या होत्या. यावेळी बोईसर पोलिसांनी देखील राजकीय दबावाखाली येवून तुटपुंजी कारवाई करत कारवाई केल्याचा आव आणला होता. विशेष म्हणजे एस. मनिष नावाचा जतीन संखे यांचा सर्वेसर्वा असलेल्या इसमांने आपल्या परिने हा विषय मार्गी लावून नेला होता.
◾वेश्या व्यवसाय प्रकरणी फरार असलेल्या जतीन संखे यांचे तारापुर औद्योगिक क्षेत्रात त्रिपल शिट नावाचे हाँटेल आहे. याच ठिकाणी बेकायदेशीर हुक्का पार्टी सुरू असल्याची माहिती मिळताच बोईसरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी धाड टाकली होती. यावेळी काही तरूण तरूणी रात्री उशिरा पोलिस ताब्यात घेतले होते. मात्र यावेळी पकडलेला हुक्का हा नशा करणारा नव्हता असे त्यानंतर पोलिसांनी सांगुन कोणत्याही प्रकारची कारवाई केली नव्हती. या प्रकरणी देखील एस. मनिष हा तडजोड करण्यासाठी पुढाकार घेऊन पुढेच होता.
◾एस. मनिष करतोय पत्रकारांना टार्गेट
सत्तरबंगला भागात दिवसभर वास्तव्य करणारा एस. मनिष नावाचा इसम हा आता वेश्या व्यवसाय प्रकरणातील आरोपी असलेल्या जतीन संखे यांची चाकरी करत असल्याचे दिसून आले आहे. पत्रकारांनी बातम्या करू नका विषय जावूद्या यासाठी हा इसम अनेकांना फोन करत आहे. विशेष म्हणजे जतीन यांच्या तोडून पत्रकारांन विरोध बोलली जात असलेली वाक्य हा एस. मनिष नावाचा इसम मोठ्या हुशारीने सर्व मार्गी लावण्यात तरबेज आहे. यामुळे वेश्या व्यवसाय प्रकरणी फरार असलेल्या आरोपींने नेमके कोणाला कोणाला संपर्क साधला राजकीय क्षेत्रात कोणाला मसाज दिला गेला याची सखोल चौकशी केल्यास बोईसर मधील मोठे हायप्रोफाईल रँकेट उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.