भाजपाच्या अशोक वडे यांना मारहाण; अशोक वडे व राजेश करवीर यांच्यात तुफान हाणामारी
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: शहराचा विकास खुंटला असला तरी येथील नेते आपले अस्तित्व राखण्यासाठी गावगुंडा सारखे भर रस्त्यात हाणामारी करत असल्याचे दिसून आले आहे. भाजप व शिवसेना पदाधिकारी यांच्या मध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून भाजपच्या बोईसर येथील नामांकित पदाधिकाऱ्याला मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत दोन्ही गटातील लोकांवर नाट्यमय घडामोडी नंतर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.
एकमेकांचे कट्टर समर्थक असलेल्या नेत्यांचे आता बोईसर मध्ये एकमेकांन विरोधात राडे होता दिसत आहेत. भाजपाचे अशोक वडे व शिवसेनेचे राजेश करवीर यांच्यात 26 आँक्टोंबर रोजी रात्री साधारण 8 वाजताच्या सुमारास तुफान हाणामारी झाल्याने नेतेच गावगुंड झाल्याचे दिसून आले आहे. भाजपचे अशोक वडे यांचे समर्थ असलेले राजेश करवीर गेल्या काही महिन्यांपूर्वी अशोक वडे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन शिवसेनेत घरवापसी केली. या दोघांन मध्ये संघर्ष मोठ्या प्रमाणात झाला असून दोघांनी भर रस्त्यावर हाणामारी केली. राजेश करवीर यांनी गणेश नगर येथे शिवसेनेचे कार्यालय उद्घाटन केले होते. याचा राग मनात धरून अशोक वडे यांचे समर्थ असलेल्या गणेश संखे यांच्या सांगण्यावरून कार्यालयाचा फलक तोडला असल्याचा संशय घेण्यात आला होता. गणेश संखे व राजेश करवीर यांच्या मध्ये सुरूवातीला वाद झाला याच वेळी याबाबत अशोक वडे यांना माहिती मिळाल्या नंतर आपल्या ओस्तवाल येथील बंगल्याच्या काही अंतरावर असलेल्या पतंजली दुकानाजवळ अशोक वडे आले. याठिकाणी असलेल्या राजेश करवीर व वडे यांच्या मध्ये वाद झाला याच दरम्यान अशोक वडे यांनी राजेश करवीर यांच्या कानशिलात लगावल्यावर तुफान हाणामारी सुरू झाली.
भाजपचे अशोक वडे यांनी हात उचलल्यानंतर राजेश करवीर यांनी वडे यांना जोरदार ठोश्या बुक्यांने मारहाण केल्याने अशोक वडे खालती देखील पडले होते. यादरम्यान अशोक वडे यांना जबर मार बसल्याचे देखील सांगण्यात येते. याच दरम्यान याठिकाणी वडे यांचे जावाई रूपेश संखे उर्फ बाली हे धावत आल्यावर त्यांने राजेश करवीर यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. भर रस्त्यावर मुख्य बाजारपेठ मध्ये चाललेली हाणामारीची चर्चा वाऱ्या सारखी बोईसर मध्ये पसरली होती. साधारण सायंकाळी सहा वाजता शिवसेनेचे कार्यकर्ते व भाजपचे अशोक वडे यांचे समर्थ बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी दाखल झाले होते. विशेष म्हणजे या दोघांच्या भांडणात बोईसरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश साळुंखे संधी शोधण्याच्या मार्गावर होते. अशोक वडे यांचीच तक्रार घेवून राजेश करवीर यांची तक्रार घेण्यासाठी चालढकल चालवली होती. मात्र रात्रभर चाललेल्या नाट्यमय घटने नंतर पहाटे पाच वाजता दोन्ही गटाच्या विरोध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
◾बोईसर पोलिस ठाण्यात ज्यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्तांनी गर्दी केली त्यावेळी तणावाचे वातावरण होते. पोलिसांच्या समोर एकमेकांना मध्ये शाब्दिक वाद देखील झाले होते. मात्र यावेळी उपस्थित असलेल्या सहाय्यक पोलिस निरिक्षक सुरेश साळुंखे यांनी फक्त बघ्याची भुमिका घेतली होती. कायदा सुव्यवस्था बिघत असताना देखील पोलिस आपले कर्तव्य पार पडण्यासाठी कमी पडल्याने पहाटे पर्यंत तणावाचे वातावरण होते. यातच पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक याठिकाणी रात्रीच्या वेळी उपस्थित नसल्याने नेत्यांवर ताबा कोणाची नव्हता.
◾शिवसेनेचे निलम संखे व मुकेश पाटील हे आपल्या कार्यकर्तांन सोबत पोलिस ठाण्यात पहाटे पाच वाजेपर्यंत उपस्थित होते. यावेळी दोन्ही बाजूने समझोता करावा असा सल्ला पोलिसांचा देखील होता. दोन्ही गटातील लोकांन वर एनसीआर दाखल करून प्रकरण याच ठिकाणी मिटविण्याचा घाट होता. मात्र झालेल्या घटने बाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेने कडून करण्यात आली होती.
◾सोमवारी सकाळी भाजपाचे अनेक पदाधिकारी बोईसरच्या पोलिस निरिक्षक यांना भेटण्यासाठी गेले होते. प्रकरण याच ठिकाणी निकाली काढण्याचा शेवटचा प्रयत्न यावेळी करण्यात आल्याचे समोर आले आहे.
◾मारहाणीत काहींनी दारूची नशा देखील केली असल्याचे प्रत्यक्षदर्शी खात्रीशीर सुत्रांकडून माहिती समोर आली आहे. मात्र पोलिसांनी दोन्ही गटातील आरोपींचे केलेले मेडिकल यामध्ये याचा उल्लेख केला आहे का याबाबत शंका आहे.
◾ गुंडगिरी करणाऱ्यांवर अनेक गंभीर गुन्हे
भाजप शिवसेना पदाधिकारी मध्ये झालेल्या हाणामारीत आरोपी असलेल्यांवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे बोईसर पोलिस ठाण्यात दाखल आहेत. प्रत्येक सणासुदीला, निवडणूक दरम्यान अशा अनेक वेळा या नेत्यांन मध्ये रोजचे वाद निर्माण होत असून यातुन गंभीर प्रकारचे गुन्हे घडतात. यामुळे बोईसरचे वातावरण तणावाचे होत असल्याने प्रमाणापेक्षा जास्त गुन्हे दाखल असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.