◾ बोईसर पोलिस ठाणे हद्दीत घडली काळीमा फासणारी घटना; धनानी नगर येथील तबेल्यात घडला धक्कादायक प्रकार
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: गोहत्याबंदी कायदा लागू झाला असला तरी गाईंची निर्घृण हत्या पालघर तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. असाच प्रकार सोमवारी रात्री बोईसर मध्ये घडला असून धनानी नगर येथे एका तबेल्यात गरोदर गाईची कत्तल करण्यात आली आहे. याबाबत तबेला मालकांने देखील सुरूवातीला कोणत्याही प्रकारची तक्रार केली नसून गाईच्या कत्तले बाबत विडीओ समाज माध्यमांवर प्रसारित झाल्या नंतर बोईसर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला. मात्र राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात होत असल्याने नेमकी काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बोईसर पुर्वे कडील धनानी नगर येथे पंढरीनाथ संखे यांचा गाई महिशीचा तबेला गेल्या अनेक वर्षांपासून याठिकाणी आहे. याठिकाणी सोमवारी रात्रीच्या वेळी तबेल्यात देखभाल करण्यासाठी असलेल्या सलीम नावाच्या इसमांने गाईची कत्तल करून तिचे मास वाहनातून विक्री साठी पाठवले होते. तबेला मालकांच्या नकलत हा प्रकार झाला असल्याचे जरी मालक सांगत असले तरी याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार मंगळवारी 16 नोव्हेंबर रोजी बोईसर पोलिसांना करण्यात आलेली नव्हती. गाईच्या कत्तल बाबत विडीओ चित्रिकरण समाजमाध्यमांवर पसरल्यानंतर बोईसर पोलिसांनी याठिकाणी जाऊन तपास सुरू केला होता. खात्रीलायक सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सलीम नावाचा इसम सकाळच्या याच ठिकाणी जेव्हा तबेला मालक आले त्यावेळी त्याठिकाणी उपस्थित होता. मिळालेल्या माहितीनुसार तबेला मालकांने याठिकाणी राहत असलेल्या सलीम याच्यावर गाईची कत्तल बाबत आरोप केले असल्याने बोईसर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
◾भाजपाचे माजी कृषी सभापती अशोक वडे यांचे सासरे असलेले पंढरीनाथ संखे गेल्या अनेक वर्षांपासून तबेला चालवतात. साधारण आठ दिवसापूर्वी सलीम नावाचा इसम याठिकाणी राहण्यासाठी आला होता. या इसमाला राहण्यासाठी जागा देताना कोणत्याही प्रकारची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नव्हती. बेकायदेशीर पणे सलीम नावाचा इसम याठिकाणी वास्तव्यात असल्याचे दिसून आले आहे.
◾तारापुर चिंचणी भागात मोठ्या प्रमाणात गोहत्या होत असल्याचे बजरंग दल व इतर हिंदुत्ववादी संघटनांनी उघड करून पोलिसांनी त्यावर कारवाई केली आहे. मात्र आता बोईसर सारख्या शहरात ते देखील एका राजकीय पुढाऱ्यांच्या सारऱ्याच्या तबेल्यात हा किळसवाणा प्रकार उघड झाल्याने गोहत्या करणाऱ्यांना कोणाची भिती उरली नसल्याने दिसून येते.
शिवसेनेने केली घटनास्थळाची पाहणी
गरोदर गाईची केलेल्या हत्येचा निषेध करत शिवसेनेच्या निलम संखे, चंद्रकांत जाधव व मुकेश पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी तबेला मालकांन सोबत चर्चा केल्यावर त्यांनी देखील सलीम नावाच्या इसमाला याठिकाणी राहण्यासाठी ठेवले असल्याचे सांगितले. त्याने असे नकलत काम केल्याचे त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. या घटनेबाबत येणाऱ्या चोवीस तासाच्या आत पोलिसांनी सर्व दोषींवर कारवाई केली नाही तर तर शिवसेना बोईसर पोलीस स्टेशन या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा शिवसेनेच्या निलम संखे यांनी दिला आहे.
◾गोहत्या झालेल्या घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, पालघर विभागाच्या पोलीस उप विभागीय अधिकारी नीता पाडवी यांच्या सह बोईसर, तारापूर, वाणगाव, पालघर, सफाळे, केळवा इत्यादि पोलीस ठाण्याचे अधिकारी बोईसरमध्ये दाखल झाले होते.
◾बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्या सोबत पोलिसांनी केला तपास
गोहत्या झालेल्या घटनास्थळी बजरंग दलाचे पदाधिकारी चंदन सिंग हे बोईसरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शाळुंके यांच्या सोबत गेले होते. पोलीस घटना स्थळाचा तपास करत असताना याठिकाणी पोलिस निरीक्षक देखील उपस्थित होते. भाजपाचे अशोक वडे यांचे खंदे समर्थक असलेल्या चंदन सिंग यांनी पोलिसांचा तपास सुरू असताना याभागात केलेली पाहणीचे छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित झाले आहेत. याबाबत बोईसरचे पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांना अधिक माहिती विचारण्यासाठी संपर्क साधला असता शासकीय दुरध्वनी बंद होता.