◾ कल्याणहून राजस्थान कडे निघालेल्या दुध टँकरवर तलासरीत पोलिसांची कारवाई; टँकर मधुन प्रवास करणाऱ्यां 12 कामगारांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पालघर दर्पण: विषेश प्रतिनिधी
पालघर: संचारबंदी असल्याने आता दुधाच्या टँकर मध्ये नक्की दुध आहे की माणसे याकडे पोलिस लक्ष देवुन आहेत. कारण देखील तसच असुन दुधाच्या टँकर मधुन चक्क कामगारांना गावी घेवुन जात असल्याचा प्रकार तलासरीत उघड झाला आहे. कल्याणहून राजस्थान कडे दुधाच्या टँक मध्ये कामगारांना बसवुन घेवुन जात असताना तपासणी दरम्यान तलासरी पोलिसांनी कारवाई केली आहे.
करोनासाठी सुरू असलेली संचारबंदी यामुळे आपल्या गावाकडे जाण्यासाठी कामगार अनेक युक्त्या लढवत आहेत. कल्याणहून राजस्थानला जाण्यासाठी 12 कामगारांनी चक्क दुधाच्या टँकर मधुन प्रवास करताना पालघर जिल्ह्यात पोलिसांनी कामगार व टँकर चालकाला ताब्यात घेतले आहे. कल्याण हुन राजस्थान कडे जाण्यासाठी निघालेले वाहन तलासरी पोलिसांनी शनिवारी सकाळी 11 च्या दरम्यान तपासणी साठी थांबवले होते. वाहनांची तपासणी केली असता त्यामुळे कोंबुन भरलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात आले. लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात असुन राज्याच्या सीमा सील असल्याने टँकर चालकाची शक्कल नवीन शक्कल लढवताना दिसत आहेत. तलासरी पोलिसांनी टँकर सह टॅकर चालक आणि कामगार ताब्यात घेतले आहे.