◾️बजलंगदलाच्या मुकेश दुबेंने तलवारीने केक कापत साजरा केला वाढदिवस
◾️बेकायदेशीर कृत्या विरोधात आवाज उठविण्याची भूमिका घेणाऱ्याकडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न केला जातोय उपस्थित व दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
पालघर: महाराष्ट्रात नोकरी धंद्या निमित्ताने आलेल्या परराज्यातील लोकांनी आता बजलंगदलाचा वापर करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. असाच प्रकार पालघर मध्ये घडला असून बजलंगदलाच्या एका पदाधिकाऱ्याने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी तलवारीने केक कापून कायदा व सुव्यवस्थेलाच आव्हान दिले आहे. तलवारी सारख्या शस्त्राने केक कापून पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करीत ते फेसबुक लाईव्ह करून हिंदुत्वाच्या रक्षणाची ओरड करणाऱ्यांचा बुरखा या कृत्याने टराटरा फाटला गेला आहे.
पालघर जिल्ह्यात सद्या परराज्यातुन आलेल्या लोकांनी हिंदूत्वाच्या नावाखाली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. बजलंगदलाच्या नावाखाली तलवारी बाहेर काढल्या जात असून वाढदिवसांचे केक देखील तलवारीने कापले जात कायदा आणि सुव्यवस्थेलाच एक प्रकारे आव्हान दिले जात आहे. त्यामुळे पालघर पोलिसांना च्या कार्यक्षमतेवर एक प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.
पालघर मधील वेवूर येथे असलेल्या बजलंगदलाच्या कार्यालयाबाहेर भर रस्त्यावर मुकेश दुबे या महाशयांनी आपला वाढदिवस साजरा करताना हे कृत्य केले आहे. वाढदिवसा निमित्ताने आणलेले चार केक तलवारीने कापण्यात आले. राज्यात अनेक ठिकाणी तलवारीने केक कापल्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी फेसबुक लाईव्ह करून तलवारीने केक कापणाऱ्या मुकेश दुबे यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई पोलिसांन कडून करण्यात आलेली नसल्याचे कळते. पोलिसांच्या याच नरमाईच्या भूमिके मुळे भर रस्त्यावर फायरिंग च्या घटना घडू लागल्या असून अज्ञात गुन्हेगारांचा शोध घेण्यात पालघर पोलीस अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.
◾️महाराष्ट्रात हे बहुसंख्य हिंदू धर्मातील लोक राहत असलेले राज्य असे तरी येथील स्थानिक कधीही धर्माचा प्रसार करताना दिसत नाही. सर्व समभाव पणे सर्व धर्माचा आदर करून राहत असले तरी आता बजलंगदल काही वेगळे असल्याचा भास दाखवत असून राजकीय नेते देखील मतांच्या गणितासाठी अशा लोकांना पाठबळ देताना दिसून येतात. पालघर जिल्ह्याचे शांत असलेले वातावरण तलवारी दाखवून भंग करण्याचा प्रयत्न केला जात असल्यामुळे अशांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांन कडून केली जात आहे.