◾️बजलंगदलाच्या मुकेश दुबेंने तलवारीने केक कापत साजरा केला होता वाढदिवस
◾️हिंदूत्वाच्या नावाखाली दहशत निर्माण करणाऱ्यांचा मुखवटा उतरला
पालघर दर्पण: प्रतिनिधी
पालघर: हिंदुत्ववादी संघटनांचा आधार घेवून दहशत निर्माण करणाऱ्यांवर पालघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी तलवारीने केक कापून पालघर मध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत केक कापतानाचे चित्रीकरण फेसबुक लाईव्ह करण्यात आले होते. याबाबत पालघर दर्पण ने सविस्तर बातमी प्रसिद्ध करत हिंदुत्वाच्या रक्षणाची ओरड करणाऱ्यांचा मुखवटा समोर आणला होता.
पालघर येथील बजलंगदलाचा पदाधिकारी असलेल्या मुकेश दुबे यांने तलवारी सारख्या शस्त्राने केक कापून पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करीत ते फेसबुक लाईव्ह करून वाढदिवस साजरा केला होता. पालघर मधील वेवूर येथे असलेल्या बजलंगदलाच्या कार्यालयाबाहेर भर रस्त्यावर मुकेश दुबे या महाशयांनी आपला वाढदिवस साजरा करताना हे कृत्य केले होते. वाढदिवसा निमित्ताने आणलेले चार केक तलवारीने कापण्यात आले होते. याबाबत सविस्तर बातमी पालघर दर्पण ने 6 डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली होती. यानुसार पालघर पोलिसांनी मुकेश दुबे व प्रभात ठाकूर यांच्यावर भा.द.वि.स कलम 269,270,188 भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 4/25 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 अशा विविध कलमानुसार 7 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
◾️पालघर जिल्ह्यात बजलंगदल ही हिंदूत्ववादी संघटना नेहमीच इतर धर्माच्या लोकांन कडून घडणाऱ्या बेकायदेशीर गोष्टींचा विरोध प्रखर पणे करताना दिसते. गोहत्या व जनावरांची होणारी तस्करी याबाबत जागृत असले तरी महाराष्ट्र आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. यातच आता पालघर मध्ये तलवारी काढून केक कापून नेमके कोणते हिंदूत्व दाखविण्याचा प्रयत्न केला जातो असा सवाल नागरिकांन कडून उपस्थित केला जातोय.
◾️ वृत्तपत्रांनी बातमी प्रसिद्ध केल्यानंतर व आँनलाईन बातमी आल्या नंतर पोलिसांनी पालघर मध्ये तलवारीने केक कापणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र अशा संघटनेबाबत पोलिस देखील नरमाईच्या भूमिका घेत असल्याने दहशत निर्माण करणाऱ्यांचे फावत आहे.