- पोलीस ठाण्याच्या मागल्या जागेवर असलेल्या गवताला व सुक्या झाडांना आगलेल्या आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने नियंत्रण आणुन आग विजवली
पालघर दर्पण: प्रतिनिधी
बोईसर: तारापुर औद्योगिक भागात असलेल्या बोईसर पोलिस ठाण्याच्या मागील गवताळ भागात आग लागल्याची घटना घडली आहे. औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर लागलीच नियंत्रण आणल्याने आग आटोक्यात आली. याच प्रत्येक वर्षी याभागात असलेल्या गवताला आग लागत असल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले.
बोईसर पोलिस ठाण्याच्या मागील बाजुस मोठ्या प्रमाणात मोकळ्या जागेवर गवताला गुरुवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली होती. सुकलेल्या गवताला लागलेली आग काही क्षणातच वाढत गेली याच दरम्यान पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या लोकांनी तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांना याबाबत सांगितले. आग लागलेल्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन दलाचा बंब काही क्षणातच दाखल होऊन आगीवर नियंत्रण आणले यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. याच ठिकाणी उच्च दाब असलेली विद्युत पुरवठा करणारी वाहिनी गेली आहे. वाहिनीत झालेल्या बिघाडामुळे पडलेल्या ठिग्या यामुळे आग लागली असल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले. आगी मुळे पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या वाहनांचे नुकसान झाले आहे.