◾️ उपविभागीय पोलीस अधीक्षक नित्यानंद झा रजेवर जाताच पुन्हा गुटखा विक्री तेजीत; गुटख्यातून हप्तेखोरीचा आरोप असलेले पोलिसांकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष
◾️ एम. के. सुपारी मार्फत गुटखा विक्रेत्यांकडून महिन्याकाठी वसुली केलेली देणगी जाते कोणाच्या खिशात
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: हप्तेखोरीत अतिशय सक्रिय असलेल्या बोईसर पोलिसांवर लाचलुचपत विभागाने अनेकदा कारवाई करून देखील येथील काही अधिकारी आपले कर्तव्य बजावण्यासाठी कसुर करत असल्याचे दिसून आले आहे. मागील महिन्यातच अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या गुटखा विक्रीवर उपविभागीय पोलिस अधीक्षक यांनी कारवाई करत गुटखा माफियांच्या मुस्क्या आवळल्या होत्या. त्याच दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांवर देखील हप्तेखोरीचा आरोप करण्यात आला होता. यातच आता उपविभागीय अधिकारी अधीक्षक रजेवर गेल्याने येथील गुटखा माफिया पुन्हा सक्रिय झाल्याची माहिती समोर आली आहे.
बोईसरचे तत्कालीन उपविभागीय पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांनी 18 डिसेंबर 2021 रोजी बोईसर भंडारवाडा येथील गुटख्याच्या गोदामावर छापा टाकून मोठ्या प्रमाणात गुटखा ताब्यात घेतला होता. याच गोदामाच्या काही अंतरावर बोईसर पोलिस ठाण्याची चौकी देखील आहे. नित्यानंद झा यांनी ही कारवाई करताना गुप्तता पाळत तारापूर पोलिस ठाण्यातील फौजफाटा मागवला होता. या संपूर्ण कारवाई मध्ये बोईसर पोलिसांना दुर ठेवण्यात आले होते. बोईसर पोलिसांच्या सहकार्याने सुरू असलेले मोलाचे काम उपविभागीय पोलीस अधीक्षक यांनी उधळून लावल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारवाई नंतर महिना उलटत असे पर्यंत बोईसर मधील गुटखा माफियांनी गुटखा विक्री बंद ठेवली होती. मात्र उपविभागीय अधिकारी अधीक्षक नित्यानंद झा आपल्या पुढील प्रशिक्षणासाठी रजेवर जाणार याची माहिती मिळताच गेल्या दोन दिवसापासून बोईसरच्या सर्व पानटपरी दुकानावर छुप्या पध्दतीने गुटखा विक्री केली जात असल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. यामुळे आता नेहमी प्रमाणे खुलेआम पोलिसांच्या सहकार्याने गुटखा विक्रीचे कार्य सुरू राहिले तर त्यात काही नवल वाटण्याचे कारण नाही.
चित्रालय येथील एम.के सुपारी नावाच्या गुटखा विक्री करणाऱ्याच्या गोदामावर बोईसर पोलिसांनी 29 जुलै 2021 रोजी रात्री 12 वाजताच्या सुमारास धाड टाकली होती. गुटखा असलेल्या गोदामाला कुलूप टाकून कारवाई साठी आलेले पोलीस नाईक थालेकर यांनी कोणत्याही प्रकारची माहिती पोलीस ठाण्याच्या स्टेशन डायरी ला लिहली नव्हती. यातच या प्रकरणाबाबत माहिती असताना देखील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश साळुंखे यांनी देखील आपल्या पोलिसाला पाठीशी घालत कोणत्याही प्रकारची कारवाई याठिकाणी केली नाही. कारण हाच एम.के सुपारी नावाने दुकान चालवणारा गुटखा माफिया सर्व गुटखा विक्री करणाऱ्या कडून महिन्या काठी लाखोची वसुली करून बोईसरच्या साहेबांना दिले जात असल्याची खात्रीशीर माहिती उपलब्ध आहे. याच मुळे बोईसर पोलिसांनी एम. के. सुपारी नावाने तंबाख विक्रीच्या नावाखाली गुटख्याचा मोठ्या पुरवठादाराकडे दुर्लक्ष केले असावे. यातच गुटखा पचविण्याची ताकद असलेल्या अधिकाऱ्यांवर वरिष्ठ स्थरावरून देखील कोणत्याही साधी चौकशी देखील केली जात नाही.
◾️ स्थानिक गुन्हे शाखेचे खंडणीखोरी प्रकरण गुलदस्त्यात?
बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी वसुली करण्याचा विडा उचला असून मुंबईच्या “वाझे” प्रमाणे पालघरच्या पोलिस खात्यातील “वाझे” कोण याचा शोध आता गृह विभागाने घ्यायला हवा. याचे कारण असे की, पोलीसांच्या हप्तेखोरी बाबत अनेक तक्रारी करून देखील कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. महिन्याभरापुर्वी बोईसर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी जमादार व पोलिसांचा वसुली खबरी असलेला मनिष संखे नावाच्या इसमाने 10 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3:30 वाजता इमरान नुराणी यांच्या गोदामावर धाड टाकली. यावेळी तंबाखू जन्य पदार्थ त्याठिकाणी असल्याने गुटख्याचा साठा असल्याचे सांगत त्याठिकाणी कामाला असलेल्या कामगारांच्या मारहाण करण्यात आली होती. हे प्रकरण दडविण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटचे पोलिस उपनिरीक्षक आशिष पाटील यांनी तिन लाखाची खंडणी वसुल केल्याचा आरोप करण्यात आला होता. इतक्यावरच न थांबता गोदामावर बनावट कारवाई बाबतचा पुरावा नष्ट करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांने गोदामात असलेला सीसीटीव्ही डिविआर आपल्या ताब्यात घेवुन डिविआर मध्ये असलेले चित्रिकरण नष्ट करून डिविआर पुन्हा इमरान यांना आणून दिला होता. मात्र अशा गंभीर प्रकरणाकडे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी देखील दुर्लक्ष केल्याने बोईसरमध्ये जनतेचे चौकीदार आता खंडणीखोरी करण्यासाठी अग्रेसर असल्याचे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.
◾️ बोईसर मधील गुटखा विक्रेते महिन्याला एम.के सुपारी मार्फत अधिकाऱ्यांना जमा करत असलेली देणगी त्यांच्या नावासह खालील प्रमाणे..
महेंदर – 10 हजार
आर. के. मंडल – 5 हजार
निशिकांत – 6 हजार
नंदे – 5 हजार
बाबू चौरसिया – 6 हजार
संदीप – 6 हजार
रोहित – 6 हजार
दयानंद- 6 हजार
शुभम- 5 हजार
सुशील – 5 हजार
विपिन – 10 हजार
मारूम- 10 हजार
रियाज – 6 हजार
रमेश – 6 हजार
इम्रान – 50 हजार
रियाज – 6 हजार
दीपक- 6 हजार
विभास – 6 हजार
नित्या – 6 हजार
मिथिलेश – 6 हजार
लक्ष्मण – 6 हजार
राठोड – 6 हजार
अरमान (साडू) – 6 हजार
दिवाकर – 6 हजार
कमल गुप्ता – 6 हजार
मुआजम – 7 हजार
अनुप – 6 हजार
विजय – 25 हजार
तिवारी – 3 हजार
साधारण एकुण वसुली लहान गुटखा विक्रेते कडून= 2 लाख 43 हजार