◾️ वाड्यातील आमगाव येथे बेसुमार केलेली वृक्षतोड व केलेला मातीच्या भरावाकडे घिरट्या मारणाऱ्या गिधाडांचे का जात नाही लक्ष
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
पालघर: लाचखोरीत राज्यात अव्वल असलेला जिल्हा असे सांगितले तर काही वावगे ठरणार नाही. कारण प्रत्येक महिन्यात एकतरी शासकीय अधिकारी याठिकाणी लाच घेताना सापडतो. अशा जिल्ह्यात आता शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून जंगल असलेले भाग गिळंकृत करणे सुरू आहे. इतकेच नवे तर केंद्राची परवानगी असल्याचे दाखले दाखवत एका उद्योजकांने सर्व नियम धुडकावून बेसुमार वृक्षतोड व उत्खनन भराव करण्याचे काम सुरू केले आहे. मात्र नेहमीच गिधाडा प्रमाणे घिरट्या मारत असलेले मात्र अशा बड्या उद्योजकांच्या नियमबाह्य कामाकडे का दुर्लक्ष करतात असा सवाल उपस्थित केला जात आहे.
वाडा तालुक्यातील आमगाव येथे इमानात मिळालेली जागा एका जमीनदारांने विराज प्रोफाइल उद्योजकाला काही वर्षांपूर्वी विकली होती. विशेष म्हणजे इमानात मिळालेल्या जागेच्या विक्री अगोदर शासनाची कोणत्याही प्रकारची पुर्व परवानगी घेण्यात आली नव्हती. भाजप शिवसेना सत्ता असताना एकनाथ खडसे यांच्या महसूल मंत्री कार्यकाळात या जागेची फाईल एकदम सफाईदार पणे सुस्थितीत केल्याचा आरोप अनेकदा करण्यात आला होता. मात्र याबाबत अगोदरच्या व आताच्या सरकारने देखील लक्ष देण्याची तसदी घेतलेली नाही हे विशेष आहे. उद्योजकांने वनविभागाची केंद्राकडून परवानगी आणल्याने येथील जिल्हा प्रशासनाने जागेच्या कागदपत्रांच्या त्रुटी कडे व प्रत्येक जागेवर असलेल्या आदिवासी नागरीकांच्या कब्जे वहिवाटी कडे कोणत्याही प्रकारची पाहणी केली नाही. आणि शेकडो एकर जागेला बिनशेती परवानगी दिली. इतरवेळी सर्वसामान्य नागरिकांने बिनशेती साठी अर्ज केल्यानंतर गिधाडां प्रमाणे चोची मारणारे बड्या उद्योजकां कडून नेमका कोणता लाभ मिळवला हा संशोधनाचा विषय आहे.
विराज प्रोफाइल उद्योजकांने तारापूर येथे बेकायदेशीर कामे पार पाडण्यासाठी ज्या ठेकेदारांना काम दिले जाते त्यांच ठेकेदारांना वाड्यातील जंगल साफ करण्याचा ठेका दिला आहे. राजकीय पाठबळ असलेल्या ठेकेदार गावगुंडांना सोबत घेवून गरीब जनतेला घाबरवून याठिकाणी काम करत असल्याचा आरोप नागरिकांन कडून अनेकदा करण्यात आला आहे. यायच शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून बेकायदेशीर कामे कायदेशीर करणारा उद्योजक पोलिस प्रशासनला पुढे करून कामकाज चालवत असल्याने सर्वसामान्य जनता न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. विराज प्रोफाइल कडून येथील आदिवासी गरिब जनतेच्या अनेक वर्षांपासून कब्जे वहिवाटीत असलेल्या जागेवरून जोरजबरदस्तीने काढत असल्याने आता सामाजिक संघटनांनी या कंपनीला विरोधात करण्यासाठी सुरुवात केली आहे. जिजाऊ सामाजिक संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी याबाबत आंदोलन छेडणार असल्याचे सांगितले असून श्रमजीवी संघटना देखील जिजाऊ सोबत कंपनी विरोधात उभी आहे.
◾️लाचखोरीची गिधाडे
दोन दिवसांपूर्वी वाड्यातील वनविभागाचा अधिकारी लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. हे सांगण्याचे कारण म्हणजे वाडा येथील बेसुमार सुरू असलेल्या वृक्षतोड कडे नियमांचे उल्लंघन केले जात असताना देखील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष का केले. लाचखोरीत अडकलेले व गिधाडांच्या भुमिकेत असलेले भ्रष्ट अधिकाऱ्यांनी उद्योजकाकडून नेमका कोणता समझोता केला याच शोध घेणे गरजेचे आहे. एखाद्या ठिकाणी एका गाडी मुरूमाचा भराव केल्याचे दिसल्यावर दिवसभर घिरट्या मारणारे तलाठी व मंडळ अधिकारी यांना नियमबाह्य सुरू असलेल्या विराज प्रोफाइलच्या उत्खनन व भरावाच्या कामाकडे लक्ष कसे जात नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.