◾️ तारापूर येथील मुस्लिम मोहल्ल्यातील जोहर युसुफ शेख सह सहा आरोपींना पकडण्यात अपयश; पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना मोहल्ल्यातील राजकीय लोकांची साथ?
◾️गंभीर घटना घडूनही पोलिस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी आजूनही तारापूर पोलिस ठाण्याला का दिली नाही भेट
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: तारापूर येथील मुस्लिम मोहल्ल्यात सुरू असलेल्या गोहत्येवर कारवाई साठी गेलेल्या पोलिसांना समाजकंटकांनी बेदम मारहाण केली. तारापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व त्यांच्या सहकार्यांना झालेल्या मारहाणी बाबत पोलिस अधीक्षक गंभीर नाहीत का असा सवाल नागरिकांन कडून उपस्थित केला जात आहे. घटनेला आठवडा उलटून जात असताना देखील मुख्य आरोपीसह सहा समाजकंटक आजूनही मोकाट असून यांना मोहल्ल्यातील राजकीय पुढाऱ्यांनी पाठबळ दिल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे तारापूर पोलिसांचे मनधैर्य उंचावण्यासाठी आता पोलिस अधीक्षकांनी अँक्शन मोड मध्ये येण्याची गरज आहे.
तारापूर परिसरात मुस्लिम मोहल्ला असलेल्या भागात वारंवार होणाऱ्या गोहत्येच्या घटनांनी कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यातच २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळी ११.३० च्या सुमारास तारापूर येथे गोहत्या होणार असल्याची खबर मिळताच तारापूर पोलिसांनी उर्दू शाळेच्या पाठीमागे असलेल्या तबेल्यात धाड टाकली होती. यावेळी दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले मात्र तेथून पळ काढलेल्या आरोपींना पकडण्यासाठी जिवाची पर्वा न करता पाठलाग सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश जाधव यांनी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केला. यावेळी आरोपींना मुस्लिम वस्ती असलेल्या भागात पकडले त्यावेळी समाजकंटक असलेल्या हैवानांनी पोलिसांना बेदम मारहाण केली. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश जाधव यांच्या हाताला दुखापत देखील झाली. तसेच पोलीस हवालदार हाडळ यांना देखील मारहाण करण्यात आली होती. या कारवाई दरम्यान दोन गायींची कत्तल करताना आरोपी शोएब कौलारीकर आणि सुलेमान पटनी यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. या घटनेनंतर पोलिस उप अधिक्षक प्रकाश गायकवाड यांनी तारापूर पोलिस ठाण्यात भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला मात्र आजही फरार असलेल्या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना अपयश आले आहे.
तारापूर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर या गोहत्येत सहभागी असलेल्या सर्वांची नावे समोर आली. घटना घडल्या नंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी तपास कार्य सुरू ठेवत अनेकांना चौकशी साठी ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपींना पाठीशी घालणाऱ्या मोहल्ल्यातील नेत्यांनी काही आरोपींना पोलिस ठाण्यात जमा केले होते. या प्रकरणातील पाच आरोपींना पोलिसांनी आजवर अटक केली असून यातील सहा आरोपी आजूनही फरार आहेत. महत्त्वाचे म्हणजे या गोहत्येतील मुख्य आरोपी व पोलिसांना मारहाण करणारा जोहर युसुफ शेख हा आजूनही फरार असून पोलिस यंत्रणा यांचा शोध घेण्यासाठी नेमके कुठे कमी पडतात हा प्रश्न उपस्थित होत आहे. काही खात्रीलायक सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे आरोपी पोलिस ठाण्यात जमा करण्यासाठी तारापूर येथील राजकीय लोकांनी दोन दिवसाचा वेळ पोलिसांना सांगितला होता. यामुळे तारापूर पोलिस राजकीय मंडळी आरोपी जमा करणार याची वाट पाहणार की आरोपींना पाठबळ व आसरा देणाऱ्यांवर देखील कारवाई करणार हे पाहणे औचित्यांचे ठरणार आहे.
◾️पोलिस अधीक्षकांना वेळच मिळेना
जिल्ह्यात चक्क पोलिसांना बेदम मारहाण झाली असताना देखील पालघरचे पोलिस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांना तारापूर पोलिसांचे मनधैर्य उंचावण्यासाठी वेळच नसल्याचे दिसून येते. 26 जानेवारी रोजी घडलेल्या गंभीर प्रकरणात जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले. मात्र पोलिसांवर हल्ला करून दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांना वेळीच आवर घालणे गरजेचे होते. परंतु आठवडा उलटून गेला असताना देखील याकडे गंभीरतेने पाहिले जात नाही.
◾️ ठाण मारून बसणारे पोलिस अधीक्षक आता कुठे गेले?
तारापुर अणुऊर्जा प्रकल्प याठिकाणी ठेका घेतलेल्या एका बड्या कंपनीच्या मुजोर अधिकाऱ्यांना काही स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी कानशिलात लगावली होती. चुक मान्य झाल्यावर अधिकाऱ्यांनी देखील गुन्हा दाखल केला नव्हता. मात्र तिन चार दिवसानंतर या प्रकरणात पोलिस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी हस्तक्षेप करत गुन्हा देखील दाखल करण्यासाठी पोलिसांना भाग पाडले. विशेष म्हणजे यावेळी पोलिस अधीक्षक यांनी तारापूर पोलिस ठाण्यात भेट देवून बैठक देखील घेतली होती. यामुळे आता गोहत्या प्रकरणात चक्क पोलिसांना मारहाण झाली असताना पोलिस अधीक्षक नेमके गेले कुठे असा सवाल नागरिकांन कडून उपस्थित केला जात आहे.