◾ तांदळाचा साठेबाजा करणाऱ्यांवर प्रांत अधिकाऱ्यांची कारवाई; मँसिंग सेंटरच्या नावाने बोगस कंपनी बनवुन केला होता साठाबाजार
पालघर दर्पण: विषेश प्रतिनिधी
बोईसर: राज्यात अन्नधान्याचा तुटवडा भासत असताना बोईसर मध्ये तांदळाच्या मोठ्या साठ्यावर कारवाई करण्यात आली आहे. लाखो किलो साठवणूक केलेला व वाहतूक करण्यात येणाऱ्या तांदळावर पालघरच्या प्रांत अधिकारी यांनी कारवाई केली आहे.
लाँकडाऊन च्या वेळी अन्नधान्याचा सर्वच ठिकाणी तुटवडा भासवून साठा बाजार करणाऱ्यांनी आपले गोरखधंदे सुरू केले आहेत. बोईसर मध्ये शनिवारी दुपारच्या नंतर उपविभागीय प्रांत अधिकारी विकास गजरे हे बोईसर भंडारवाडा भागातुन जात असताना रस्त्यावर एक मोठा मालवाहू ट्रक तांदूळ गोणी भरलेला आढळून आला यामध्ये सुमारे 19 टन तांदुळ आणण्यात आला होता. तसेच बाजुला असलेल्या गोडाऊन मध्ये असलेला लाखो किलो तांदूळ साठवणूक करून ठेवण्यात आला होता. विषेश म्हणजे ए टु जेड मँचिंग सेंटर नावाने बोगस कंपनी बनवुन तांदूळ साठवणूक करून चढे भावाने विक्री केली जात असल्याचे उघड झाले आहे.
कारवाई करण्यात आलेला तांदूळ हा आंध्रप्रदेश मधुन आणण्यात आला होता. आंध्र प्रदेशातून तांदूळ भरून निघाल्याचे ट्रक चालका कडे डहाणू येथील व्यापारी भावेश देसाई यांच्या कडे जाण्याबाबतची कागदपत्रे होती. मात्र हा तांदूळ बोईसर मध्ये साठाबाजार करताना आढळून आला आहे. यामुळे डहाणू येथील व्यापारी बोईसर भागात धान्याचा काळाबाजार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रांत अधिकारी विकास गजरे यांनी केलेली ही पालघर मधील मोठी कारवाई असुन अन्नधान्य तुटवडा असताना देखील पुरवठा विभागाचे दुर्लक्ष या साठेबाजा करणाऱ्यांवर केलेल्या कारवाई नंतर समोर आले आहे. यावेळी तहसीलदार सुनील शिंदे, मंडळ अधिकारी, मनिष वर्तक, संदीप म्हात्रे, तलाठी हितेश राऊत, उज्वला पाटील, साधना भालेकर आदी अधिकारी उपस्थित होते. कारवाई बाबत पंचनामा सुरू मालवाहू वाहन देखील जप्त करण्यात आला असुन बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.