◾️ पत्रकारांच्या सहकार्याने बोईसर पोलिसांची धडक कारवाई
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: शहरात चोरीचे मोबाईल विकाणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून पत्रकारांच्या मदतीने बोईसर पोलिसांनी कारवाई केली आहे. येथील गोसलिय पार्क बस डेपोच्या बाजूला असलेल्या एका मोबाईल रिपेअर दुकानात चोरीचा मोबाईल विक्री साठी येणार असल्याची माहिती समोर आली होती. यानुसार साफळा रचून चोरट्यांना ताब्यात घेतले असून याठिकाणी मुख्य सुत्रधार मात्र नेहमी प्रमाणे यावेळी देखील पोलिसांच्या हाती लागला नाही.
बोईसर शहरात मुंबई व इतर ठिकाणाहून चोरून आणलेले आयफोन व इतर महागडे मोबाईल कमी किंमती मध्ये विक्री करण्यासाठी आणले जात असल्याची खात्रीशीर माहिती पत्रकार प्रमोद तिवारी व पालघर दर्पणचे संपादक हेमेंद्र पाटील यांना प्राप्त झाली होती. याबाबत तातडीने बोईसर उपविभागीय पोलीस अधिकारी के. हेगाजे यांना याबाबत 8 मार्च 2022 रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास कळविण्यात आले होते. तसेच मोबाईल विक्रीसाठी चोरटे बोईसर येथील गोसलिय पार्क बस डेपोच्या बाजूला असलेल्या सेल मेट्रो बोईसर या मोबाईल रिपेअर दुकानात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर तातडीने याठिकाणी पत्रकार प्रमोद तिवारी व हेमेंद्र पाटील दाखल झाले होते. याठिकाणी लागलीच उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी देखील बोईसर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रगटीकरण विभागाचे सुरेश दुसाने यांना पाठवले होते. महत्त्वाचे म्हणजे याचवेळी इतर पोलिस वेगवेगळ्या तपास कामासाठी बाहेर गेले असल्याने चोरांना पकडणे खुपच जिकरीचे होते. मात्र पत्रकारांच्या मदतीने बोईसर पोलिसांनी आरोपीला मोबाईल विकण्यासाठी आलेला अफजल खान याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
बोईसर शहरात मोबाईल चोरट्यांचे मोठे जाळे असून याठिकाणी देखील अनेक विषय उघडकीस आले. चोरीचा मोबाईल विकण्यासाठी अफजल खान या तरूणाला पाठवले होते. तर मुख्य सुत्रधार विशाल मिश्ना हा विकलेल्या मोबाईलचे पैसे घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आरोपीला बोलवू लागला होता. यातील अधिक माहिती अशी की, सेल मेट्रो बोईसर या दुकानात चोरीचा मोबाईल विकण्यासाठी आलेल्या अफजल खान नावाच्या तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मुख्य सुत्रधार विशाल मिश्ना याला पकडण्यासाठी यावेळी पकडलेल्या आरोपींने समोरच्या व्यक्तीला फोन करून पैसे घेण्यासाठी बोलवले मात्र अतिशय सराईत गुन्हेगार असलेल्या विशालने पैसे घेण्यासाठी वेगवेगळ्या तरूणांना पाठवले होते. यावेळी राकेश चौरसिया तरूणाला बोईसरच्या शिवमंदिर भाजी मार्केट गल्ली याठिकाणी पकडण्यात आले. यानंतर मुख्य सुत्रधार असलेल्या विशाल ने समोरील ताब्यात असलेल्या अफजल कडून पैसे घेण्यासाठी भंडार वाडा येथील रेल्वे लगत असलेल्या वस्तीजवळ बोलवले. यावेळी बोईसर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रगटीकरण विभागाचे सुरेश दुसाने व दादा शिंदे हे दोन पोलिस याठिकाणी सराईत गुन्हेगार असलेल्या विशाला पकडण्यासाठी याभागात दाखल झाले होते. मात्र नेहमी प्रमाणे यावेळी देखील मुख्य सुत्रधार असलेला सराईत गुन्हेगार विशाल मिश्ना पोलिसांच्या हातुन निसटला. यावेळी बोईसर रेल्वे स्टेशन पुर्वेला पोलिस उपनिरीक्षक शिरोडकर हे देखील तपासासाठी दाखल झाले होते.
◾️ बोईसर पोलिसांनी आयफोन विक्री साठी आणलेल्या दोन आरोपींची कसुन चौकशी केली असता याठिकाणी आणखी गणेश चिनर्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे चोरीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या राकेश चौरसिया यानेच आयफोन मुंबई येथील मरिन लाईन येथून केटरींग च्या कामाच्या ठिकाणाहून आणण्यात आला होता. हा मोबाईल सेल मेट्रो बोईसर येथील दुकानात फराहान याला 12 हजार रूपयात विकण्याचा सौदा झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले होते.
◾️बोईसर येथील मोबाईल रिपेअर करणाऱ्या सेल मेट्रो बोईसर या दुकानात चोरीचे मोबाईल याअगोदर देखील दिले असल्याचे आरोपी अफजल खान यांने बोईसर पोलिसांना सांगितले आहे. यामुळे या दुकानदारांची चौकशी होणे गरजेचे असून याठिकाणी आयफोन चे लाँक व एम ई आयी नंबर देखील बदलला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
◾️बोईसर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका मोबाईल चोरी गुन्ह्यात विशाल मिश्ना हा फरार आरोपी असून हा सराईत गुन्हेगार चोरीचे मोबाईल, सोनसाखळ्या, दुचाकी, चारचाकी वाहने अश्या प्रकारे वस्तू विक्री साठी विविध तरूणांना हाताशी धरून हे काम बोईसर मध्ये करत असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. विशाल या सराईत गुन्हेगाराच्या संपर्कात अनेक गुन्हेगार तरूण असून मोठे जाळे त्यांनी बोईसर भागात बनवले आहे. विशेष म्हणजे अनेक महिन्यांन पासुन फरार असलेला आरोपी नेमका मोबाईल चोरी गुन्ह्यात पुन्हा निष्पन्न झाला असल्याने आता तरी बोईसर पोलिसांनी यावर ठोस कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे. सामाजिक बांधिलकी व पोलिसांना चांगल्या कामात सहकार्य म्हणून पत्रकारांनी देखील आपला जीव धोक्यात घालून गुन्हेगारांना पकडण्यासाठी सहकार्य केल्यांने पोलिसांनी देखील त्यांचे आभार मानले आहेत.